SA vs IND Tour : टी-२० सामन्यांमध्ये कप्तानीसाठी बीसीसीआय रोहीत शर्माचं मन वळवतील का?

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

169
SA vs IND Tour : टी-२० सामन्यांमध्ये कप्तानीसाठी बीसीसीआय रोहीत शर्माचं मन वळवतील का?

ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (SA vs IND Tour) रवाना होणार आहे. आणि या दौऱ्यात संघाला ३ टी-२०, ३ एकदिवसीय तसंच २ कसोटी सामने खेळायचे आहेत. विराट कोहलीने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचं जवळ जवळ निश्चित झालं आहे.

दुसरीकडे कर्णधार रोहीत शर्माही टी-२० मालिकेत (SA vs IND Tour) खेळायला फारसा उत्सुक नाहीए. पण, तो खेळला नाही तर टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. कारण, नियमित टी-२० कर्णधार हार्दिक पांड्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. अशावेळी रोहीतनेच टी-२० आणि नंतर एकदिवसीय मालिकेतही कप्तानी करावी असं बीसीसीआयला वाटतं.

(हेही वाचा – Rajiv Dixit : सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित, ज्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकलले नाही)

पण, २०२१ च्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेत उपान्त्य सामन्यात (SA vs IND Tour) झालेल्या पराभवानंतर रोहीत शर्मा या प्रकारापासून दूरच राहिलेला आहे. तसंही त्याचं वय पाहता तो टी-२०चा वाढता ताण कमी करून एकदिवसीय आणि कसोटी खेळण्यावरच जास्त भर देऊ इच्छितो.

पण, दक्षिण आफ्रिकेसारख्या खडतर दौऱ्यात बीसीसीआयला (SA vs IND Tour) रोहीतवरच भरवसा आहे. आणि त्यामुळे रोहीतचं त्या दृष्टीनं मन वळवलं जात असल्याचं खात्रीलायकरीत्या कळतंय. रोहीतने मात्र अजून याला होकार दिलेला नाही.

ऑस्ट्रेलिया बरोबरची मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. आणि फक्त दोन सामने बाकी आहेत. तोपर्यंत आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवड होणं अपेक्षित आहे. पण, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी अजून निवड समितीच्या बैठकीबद्दलही भाष्य करण्याचं टाळलंय. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी संघ जाहीर (SA vs IND Tour) होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पडद्यामागच्या या हालचालींना वेग आला आहे.

(हेही वाचा – P. S. Ramani : प्रख्यात न्यूरोसर्जन – पी. एस. रमाणी)

रोहीतने नकार दिल्यास निवड समितीसमोर (SA vs IND Tour) पर्याय उरतो तो सुर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांचा. शिवाय आयर्लंड विरुद्ध जसप्रीत बुमरानेही एकदा टी-२० संघाचं नेतृत्व केलेलं आहे.

या मालिकेतून भारताच्या २०२४ वर्ल्ड टी-२० स्पर्धेची (SA vs IND Tour) तयारी सुरू होणार आहे. आणि या महत्त्वाच्या स्पर्धेपर्यंत रोहीत शर्मानेच संघाचं नेतृत्व करावं अशी बीसीसीआयची इच्छा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.