Sachin on Virat Kohli : ‘विराटमध्ये अजून बरंच क्रिकेट आणि भरपूर धावा शिल्लक आहेत’

सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांचा विक्रम अलीकडेच विराट कोहलीने मोडला. या गोष्टीसाठी सचिनने विराटचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं आहे आणि विराटमध्ये अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे असं म्हटलं आहे. 

126
सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांचा विक्रम अलीकडेच विराट कोहलीने मोडला
सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांचा विक्रम अलीकडेच विराट कोहलीने मोडला
ऋजुता लुकतुके

सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांचा विक्रम अलीकडेच विराट कोहलीने मोडला. या गोष्टीसाठी सचिनने विराटचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं आहे आणि विराटमध्ये अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे असं म्हटलं आहे.

नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. पण, आधीचे दहा सामने मात्र भारतीय संघाने रुबाबात जिंकले. साखळी सामने आणि उपान्त्य सामन्यांत विराट कोहलीची बॅट तळपली. आणि त्याने स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा केल्या. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रमही मागे टाकला.

तेव्हापासून सचिन तेंडुलकर विराटचं कौतुक करताना थकत नाहीए. आताही आपला सर्वाधिक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम भारतीयाकडेच राहिला या गोष्टीबद्दल त्याने अभिमान व्यक्त केला आहे. आणि विराट अजूनही काही वर्षं मैदान गाजवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.

(हेही वाचाAarey Forest : आरे मधून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ग्रीन टोल लागणार?)

‘विराटने हा विक्रम मोडला याचा मला आनंदच आहे. विराटमध्ये अजून अनेक वर्षं क्रिकेट खेळण्याची आणि धावा वाढवण्याची क्षमता आहे. त्याच्यातील धावांची भूक शमलेली नाही. देशासाठी चांगली कामगिरी करण्याची इच्छा अजून संपलेली नाही. त्यामुळे त्याच्या हातून आणखी मोठी कामगिरी होतच राहणार आहे,’ असं सचिन ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाला.

या विश्वचषकात विराटने सचिनचे आणखी काही विक्रम मोडले. स्पर्धेतील ११ सामन्यांत विराटने ९५ धावांच्या मजबूत सरासरीने ७६५ धावा केल्या. यात ३ शतकं आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांचा सचिनचा विक्रमही मोडला. तर सचिनने २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा केल्या होत्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकांबरोबरच सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही आता विराटने आपल्या नावावर केला आहे.

२०२३ कॅलेंडर वर्षांत, विराटने २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७२.४७ धावांच्या सरासरीने १,३७७ धावा केल्या आहेत. यात ६ शतकं आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. १६६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर स्टाईक रेटही ९९ धावांचा तगडा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.