
-
ऋजुता लुकतुके
सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर फलंदाजीतील प्रत्येक विक्रम आहे. या घडीला सर्वाधिक कसोटी धावा, सर्वाधिक एकदिवसीय धावा तसंच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. तर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत मिळून त्याच्या नावावर ३४,००० धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं करणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण, विशेष म्हणजे यातील एकही शतक टी-२० प्रकारातील नाही. कारण, आपल्या कारकीर्दीत सचिन (Sachin Tendulkar) केवळ एकच टी-२० सामना खेळला. २००७ मध्ये भारतीय संघ टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकला, तेव्हापासून युवा खेळाडूंना हा प्रकार खेळू देण्याचं बीसीसीआयचं (BCCI) धोरण ठरलेलं होतं. त्यामुळे २६ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघ तेव्हा ही स्पर्धा खेळला.
(हेही वाचा – Mumbai Local Mega Block : रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ! रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, वाचा वेळापत्रक)
सचिन, सेहवाग, द्रविड, गांगुली हे खेळाडू टी-२० पासून लांब राहिले. आणि त्यांनी कसोटीवर लक्ष केंद्रीत केलं. सचिन आपल्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत एकमेव आंतरराष्ट्रीय टी-२० खेळला ती दक्षिण आफ्रिकेत. १ डिसेंबर २००६ साली झालेल्या या सामन्यात सचिन (Sachin Tendulkar) भारताकडून सलामीला खेळला होता. या दौऱ्यात हा एकमेव टी-२० सामना जोहानसबर्ग इथं आयोजित करण्यात आला होता. यात पहिली फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं सर्वबाद १२६ धावा केल्या. यात एल्बी मॉर्केलने (Albie Morkel) सर्वाधिक २७ तर जस्टिन केम्पने २२ धावा केल्या होत्या. भारताकडून झहीर खान आणि अजित आगरकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरादाखल, सेहवाग आणि सचिन ही सलामीची भारतीय जोडी मैदानात उतरली. पण, सचिन (Sachin Tendulkar) डावातील चौथ्या षटकात लांगवेल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला होता.
त्यानंतर सेहवागने ३४, दिनेश मोंगियाने ३८ तर दिनेश कार्तिकने नाबाद ३१ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. त्यानंतर लगेचच २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक दक्षिण आफ्रिकेतच आयोजित करण्यात आला. आणि तिथे महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला.
२००६ नंतर आंतरराष्ट्रीय दौऱ्यांत टी-२० सामने आयोजित करण्याला सुरुवात झाली. सुरुवातीला एका मालिकेत तीनच़्या वर टी-२० सामने आयोजित करायला आयसीसीची परवानगी नव्हती. पण, २०२० नंतर एका मालिकेत पाच टी-२० सामने भरवायची मुभा आता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community