सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल! काय आहे सचिनचे ट्वीट?

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाल्यामुळे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः सचिनने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तसेच आपली प्रकृती उत्तम असून केवळ अतिरिक्त खबरदारी घेण्यासाठी आपण रुग्णालयात दाखल झाल्याचे त्याने सांगितले आहे.

ट्वीट करत दिली माहिती

काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे खबरदारी बाळगण्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचे सचिनने ट्वीट करत सांगितले आहे. तसेच आपल्याला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करणा-या सर्व चाहत्यांचे सचिनने ट्वीट करत आभार मानले आहेत. सचिनच्या या ट्वीटवर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्याला लवकर बरे वाटावे म्हणून त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आठवणींना दिला उजाळा

२०११चा वर्ल्ड कप जिंकून भारताला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. सचिन तेंडुलकर या वर्ल्ड कपच्या विजयाचा शिल्पकार आहे. आणि म्हणूनच त्याने या दिवसाच्या आठवणी ताज्या करत आपल्या संघाला आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हा दिवस सचिनच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस आहे, असे सचिनने वारंवार सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here