- ऋजुता लुकतुके
भारतरत्न सचिन तेंडुलकरला नवा राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकर देशाची राष्ट्रीय प्रतिमा असल्याचं जाहीर केलं आहे. मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरला मानाचं राष्ट्रीय प्रतिमा बहुमान प्रदान केला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून २३ ऑगस्टला एक खास कार्यक्रमात सचिनला सन्मानपूर्वक राष्ट्रीय प्रतिमा होण्याचा मान दिला जाईल. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आणि यात ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी १०० शतकं त्याने ठोकली आहेत. त्याच्या या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा सन्मान म्हणून निवडणूक आयोगाने सचिनला राष्ट्रीय प्रतिमा होण्याचा मान दिला आहे.
(हेही वाचा – Infectious disease : हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ, डॉक्टरांकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन)
आपल्या कसोटी कारकीर्दीत सचिनने ५१ शतकं तसंच ६८ अर्धशतकं ठोकली आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४६३ सामने खेळताना १८,४२६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय प्रकारात सचिनने ४९ शतकं ठोकली आहेत. तर ९६ अर्धशतकं केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद २०० ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. कसोटी प्रकारात २४० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
It was wonderful to spend time with CAS Air Chief Marshal VR Chaudhari and the dedicated personnel of the @IAF_MCC. The commitment to safeguarding our skies fills me with immense pride. A salute to the courage, dedication, and relentless spirit of this one big team.… pic.twitter.com/xYHXnhVGSK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 22, 2023
सचिन एक टी-२० सामनाही खेळला आहे. एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने ६६४ सामन्यांमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. तर विक्रमी ६ विश्वचषक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तर शंभर शतकं ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community