-
ऋजुता लुकतुके
सचिन तेंडुलकरविषयी असं म्हणतात की, तुम्ही सचिनला क्रिकेटपासून वेगळं करू शकता. पण, त्याच्यातून क्रिकेट वेगळं करू शकत नाही. खासकरून त्याच्या लाडक्या बॅट पासून तर तो दूर होऊच शकत नाही. टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी अमेरिकेत असलेल्या सचिन तेंडुलकरने तिथेही बॅट हातात धरली. पण, यावेळी क्रिकेटची नाही. तर चक्क बेसबॉलची. (Sachin Tendulkar in the USA)
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर सचिन तेंडुलकर नेट्समध्ये बेसबॉल खेळताना दिसतो. टाईम्स ऑफ कराची या सोशल मीडिया हँडलवर हा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. सचिन क्रिकेटच्याच नेट्समध्ये आहे. पण, चेंडूचा मुकाबला तो बेसबॉलच्या बॅटने करतोय. आणि त्याला खेळताना पाहायला गर्दीही झाली आहे. (Sachin Tendulkar in the USA)
(हेही वाचा – BMC Head Office : महापालिका मुख्यालय इमारतीतील कर्मचारी भीतीच्या छायेखाली, सलग दुसऱ्यांदा सुट्टीच्या दिवशी घटना)
Sachin Tendulkar played with a baseball bat instead of a cricket bat. Our correspondent from New York provides insights about this event.#ShellVPower #ShellPakistan #T20WorldCup #T20WCWithTOK pic.twitter.com/sOiYONC6bE
— Times of Karachi (@TOKCityOfLights) June 8, 2024
(हेही वाचा – Crime: सोन्याच्या तस्करीप्रकरणी २ परदेशी महिलांना अटक)
सचिनने काही बेसबॉलचे फटके मारण्याचा प्रयत्न या व्हीडिओत केला आहे. आणि बेसबॉलची मजाही लुटली. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही देशांतील चाहते न्यूयॉर्कमध्ये आले होते. आणि ३९,००० क्षमतेचं नसॉ काऊंटी स्टेडिअम हाऊसफुल्ल होतं. सचिन तेंडुलकरही आपली पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसह हा सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आला आहे. (Sachin Tendulkar in the USA)
सचिनचे अमेरिकेतही चाहते आहेत. आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी जेव्हा आयोजकांनी मैदानात सचिनला मुलाखतीसाठी बोलावलं तेव्हा दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष करून त्याचं स्वागत केलं. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ धावांनी निसटता विजय मिळवला. पहिली फलंदाजी करत भारताने ११९ धावा केल्या होत्या. पण, पाकिस्तानला ७ बाद ११३ धावसंख्येवर रोखत भारताने ६ धावांनी महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. (Sachin Tendulkar in the USA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community