दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर, सचिनच्या ट्वीटची होतेय चर्चा

155

क्रिकेटचं मैदान असो किंवा सोशल मीडियाची वॉल सचिन तेंडुलकर फटकेबाजी करायला अजिबात मागे नसतो. आता मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या एका निर्णयाचं स्वागत करताना सचिनने एक हटके ट्वीट केलं आहे. दुचाकीवर स्वार असणा-या दोन्ही व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचा संबंध सचिनने थेट क्रिकेटच्या मॅचशी जोडला आहे. हा संबंध जोडत हेल्मेट सक्तीचा मुंबई वाहतूक पोलिसांचा निर्णय किती योग्य असल्याचे सचिन तेंडुलकरने पटवून दिले आहे. त्याच्या या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)

सचिनचं ट्वीट

आयसीसीने स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर असणा-या फलंदाजांना हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. तसेच आता मुंबई वाहतूक पोलिसांनीही दुचाकी चालवणा-यासोबत(स्ट्राईकर) मागे बसलेल्या(नॉन स्ट्राईकर) व्यक्तीला हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे. हेल्मेट आपला जीव वाचवतात, मैदानातही आणि मैदानाच्या बाहेरही. असं मिश्कील ट्वीट करत सचिनने मुंबई वाहतूक पोलिसांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यातून सर सलामत तो पगडी पचास हाच सल्ला सचिनने दिला आहे.

(हेही वाचाः विनाकारण हॉर्न वाजवणं पडणार महागात; मुंबई पोलीस राबवणार ‘ही’ अनोखी मोहीम)

कारवाईचा इशारा

वाहन कायदा 1988 नुसार दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणा-या व्यक्तीसाठी हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे. पण या कायद्याचे पालन होताना दिसत नसल्यामुळे आता मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत कडक पावले उचलली आहेत. या नियमाचे पालन न केल्यास 15 दिवसांनी धडक कारवाई सुरू करण्यात येणार असून, हेल्मेटशिवाय दुचाकी चालविल्यास 500 रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.