Sachin Tendulkar Left Mumbai Indians? रोहितच्या हकालपट्टीमुळे खरंच सचिनने ही मुंबई इंडियन्स संघाचं मेंटॉर पद सोडलं का? 

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केल्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या पसरल्या आहेत

619
Sachin Tendulkar Left Mumbai Indians? रोहितच्या हकालपट्टीमुळे खरंच सचिनने ही मुंबई इंडियन्स संघाचं मेंटॉर पद सोडलं का? 
Sachin Tendulkar Left Mumbai Indians? रोहितच्या हकालपट्टीमुळे खरंच सचिनने ही मुंबई इंडियन्स संघाचं मेंटॉर पद सोडलं का? 

ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव होण्याच्या काही दिवस आधी मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने (Sachin Tendulkar Left Mumbai Indians? ) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १० वर्षं संघाचं नेतृत्व केलेल्या रोहीत शर्माची हकालपट्टी करून त्याच्या जागी हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजीही व्यक्त केली. आणि मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने आपले काही हजार ऑलोअर्स एका दिवसांत गमावले.

त्याचबरोबर रोहीतने कप्तानी सोडलेली नाही, तर त्याला काढून टाकण्यात आलं, अशीही बातमी सोशल मीडियावरच पसरली. हे सगळं कमी म्हणून की काय रविवारपासून आणखी एक बातमी व्हायरल झालीय ती सचिन तेंडुलकर विषयी. रोहीतच्या गच्छंतीनंतर सचिन तेंडुलकरने संघाचं मेंटॉरपद सोडल्याची एक बातमी सोमवारी वाऱ्यासारखी पसरली होती.

पण, ही बातमी केवळ अफवा असल्याचं आता सिद्ध झालं आहे. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीच्या अधिकृत पेजवर अजूनही मेंटॉर म्हणून विराजमान आहे. आयपीएल सुरू झाली तेव्हापासून सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाबरोबर आहे. २०११ आणि १२ च्या हंगामात तो संघाचा कर्णधारही होता.

पण, फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी २०१३ मध्ये त्याने कप्तानी सोडली. आणि कर्णधारपद रोहीत शर्माकडे आलं. २०१३ नंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. २०१३ च्या चॅम्पियन्स लीगमध्ये सचिन मुंबई इंडियन्सकडून शेवटचं खेळला.

त्यानंतर २०१४ पासून सचिन मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक अर्थात, मेंटॉर आहे.

सचिन मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्याच्या बातमीला कुणीही अधिकृत दुजोरा दिला नव्हता. तरीही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सचिन संघाचा मेंटॉर असल्यामुळे त्याची संघाबरोबर पूर्णवेळ उपस्थिती अनिवार्य नाही. त्यामुळे तो संघाबरोबर सगळीकडे प्रवास करत नाही. पण, महत्त्वाचे सामने आणि कार्यक्रमांना असतो. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळतो आहे. आणि संघाने त्याला लिलावापूर्वी आपल्याकडे कायम राखलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.