Sachin Tendulkar Net Worth : निवृत्ती नंतरही सचिन तेंडुलकर वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी, सचिनकडे असलेल्या १० महागड्या वस्तू

निवृत्ती नंतरही सचिन तेंडुलकरचं ब्रँड मूल्य जराही कमी झालेलं नाही. शिवाय सचिनने काही स्टार्ट अपमध्येही गुंतवणूक केलीय. त्यामुळे आताही दरवर्षी सचिन बक्कळ पैसे कमावतो. त्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न आणि त्याच्याकडे असलेल्या १० महागड्या वस्तू बघूया…

275
Sachin Tendulkar Net Worth : निवृत्ती नंतरही सचिन तेंडुलकर वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी, सचिनकडे असलेल्या १० महागड्या वस्तू
Sachin Tendulkar Net Worth : निवृत्ती नंतरही सचिन तेंडुलकर वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी, सचिनकडे असलेल्या १० महागड्या वस्तू

निवृत्ती नंतरही सचिन तेंडुलकरचं ब्रँड मूल्य जराही कमी झालेलं नाही. शिवाय सचिनने काही स्टार्ट अपमध्येही गुंतवणूक केलीय. त्यामुळे आताही दरवर्षी सचिन बक्कळ पैसे कमावतो. त्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न आणि त्याच्याकडे असलेल्या १० महागड्या वस्तू बघूया… (Sachin Tendulkar Net Worth)

सचिन तेंडुलकर हा भारतातलाच नाही तर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक गणला जातो. ऐन भरात असताना सचिनचं ब्रँड मूल्य सगळ्यात जास्त होतं आणि आता ५० वर्ष पूर्ण केल्यानंतरही ती जराही कमी झालेली नाही. सचिन वर्षाला सरासरी १३५४ कोटी रुपये कमावतो. त्याने स्पीनी, सॅच यासारख्या काही स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. शिवाय तो काही कंपन्यांचा ब्रँड अँबेसिडरही आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

क्रिकेट खेळण्याबरोबरच आधीपासून सचिनला उदयोजकतेत रस होता आणि त्याने यापूर्वी तेंडूलकर्स हे हॉटेलही चालवलं होतं. २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार सचिन तेंडुलकरची एकूण मालमत्ता १७० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. त्यामुळे निवृत्ती नंतरही सचिन जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

 

View this post on Instagram

 

A post shared by StockGro (@stock_gro)

(हेही वाचा – Amitabh Bachchan : जाणून घ्या महानायक बिग बी यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी)
सचिन तेंडुलकरच्या मालकीच्या दहा महागड्या गोष्टींवर एक नजर टाकूया…

१. वांद्रे-कुर्ला संकुलात सचिनने एक अल्ट्रा-प्रिमिअम श्रेणीतील फ्लॅट २०१८ मध्ये विकत घेतला होता. त्याची किंमत सध्या ७.१५ कोटी रुपये इतकी आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

२. २०११ च्या विश्वचषक विजयानंतर सचिन तेंडुलकर वांद्रे इथं पॅरी-क्रॉस रोडला आपल्या नवीन बंगल्यात राहायला गेला. तिथली जुनी पडिक जमीन विकत घेऊन सचिनने तिथे आधुनिक बंगला बांधला. सध्या त्या जागेचीच किंमत ३९ कोटी रुपये इतकी आहे. सचिनने जुन्या जागी नुतनीकरण करण्यासाठी ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत. (Sachin Tendulkar Net Worth)

३. सचिन तेंडुलकरकडे असलेली बीएमडब्ल्यू एक्स५ ही गाडी पूर्वी मुंबईत चर्चेचा विषय होती. २०२१ मध्ये त्याने ती १.७४ कोटी रुपयांना विकली. (Sachin Tendulkar Net Worth)

४. सध्या त्याच्याकडे असलेली बीएमडब्ल्यू आय८ ही गाडी तर २.६२ कोटी रुपयांची आहे आणि सचिनने त्यात काही बदल करून घेतल्यानंतर तिची किंमत ४.२५ कोटी रुपये इतकी झाली आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

५. तर सचिनकडे असलेली बीएमडब्ल्यू एम५ ३० एमएस ही गाडी तर लिमिटेड एडिशन आहे. कंपनीने अशा फक्त ३०० गाड्या जगभरात बनवल्या आहेत आणि त्यातली एक सचिनकडे आहे. तिची किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

६. सचिनला स्पोर्ट्स कारचीही आवड आहे. २०१५ मध्ये त्याने बीएमडब्ल्यू ७५० लीएम ही गाडी विकट घेतली होती. त्याची किंमत १.७३ कोटी रुपये इतकी आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

७. सचिन तेंडुलकर किमती घडाळ्यांचाही चाहता आहे. त्याने रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर घड्याळ विकत घेतलं होतं ज्याचं किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. ऑडमार्स पिकने हे घड्याळ बनवलं होतं. (Sachin Tendulkar Net Worth)

८. सचिनच्या नवीन बंगल्यात पहिले ३ मजले हे पार्किंगसाठी ठेवण्यात आले आहेत आणि या त्याच्या गॅरेजमध्ये बीएमडब्ल्यू एम६ ग्रॅन कपल ही गाडीही आहे. भारतात एकट्या सचिनकडे ही गाडी आहे. त्याची किंमत १.८ कोटी रुपये इतकी आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

९. सचिनने अलीकडेच म्हणजे २०२२ मध्ये पोर्श कंपनीची कायन कार विकत घेतली आहे. या गाडीची किंमत १.९३ कोटी रुपये इतकी आहे. सचिन रात्रीच्या वेळी वेगाने ही गाडी हाकताना कधी कधी वांद्रे परिसरात दिसतो. (Sachin Tendulkar Net Worth)

१०. सचिनने २९ वं कसोटी शकत करत सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली, तेव्हा सचिनला फेरारी ३६० ही गाडी भेट म्हणून मिळाली होती. गाडीची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती आणि भारतात आयात शुल्क भरून तिची किंमत ११ कोटी रुपयांवर गेली. सचिनने अलीकडेच ती गाडी विकली आहे. (Sachin Tendulkar Net Worth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.