Sachin Tendulkar on Maxwell : ‘मी अशी खेळी कधी पाहिलेली नाही.’ या शब्दांत सचिनने केलं मॅक्सवेलचं कौतुक

ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावा करत ऑस्ट्रेलियाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. माजी खेळाडू त्यानंतर त्याचं कौतुक करताना थकत नाहीएत.

185
Sachin Tendulkar on Maxwell : ‘मी अशी खेळी कधी पाहिलेली नाही.’ या शब्दांत सचिनने केलं मॅक्सवेलचं कौतुक
Sachin Tendulkar on Maxwell : ‘मी अशी खेळी कधी पाहिलेली नाही.’ या शब्दांत सचिनने केलं मॅक्सवेलचं कौतुक

ऋजुता लुकतुके

शब्दश: एका पायावर उभं राहून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने (Sachin Tendulkar on Maxwell) मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर इतिहास रचला. डाव्या पायाची नस दुखावल्यामुळे उभंही राहता येत नव्हतं. पण, मॅक्सवेलने नेटाने १२८ चेंडूंत २०१ धावा करत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. ते सुद्धा ९१ धावांवर ७ गडी बाद झाले असताना तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून त्याने ही कामगिरी केली.

मॅक्सवेलने या दरम्यान अनेक विक्रम तर मोडलेच. शिवाय डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या खेळीनंतर दिग्गज खेळाडूंचं कौतुकही मिळवलं आहे. यात सगळ्यात पुढे होता मुंबईकर फलंदाज आणि क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर. द्विशतक पूर्ण झाल्या झाल्या सचिनने एक मोठी पोस्ट ट्विटरवर लिहिली. आणि याची सुरुवातीच होती, ‘अशी खेळी यापूर्वी मी कधी पाहिली नव्हती.’ सर्वाधिक दडपण असताना केलेली सर्वोत्तम खेळी असं तिचं वर्णन सचिनने केलं आहे. त्याचवेळी अफगाण शतकवीर झदरानचंही त्याने कौतुक केलं. (Sachin Tendulkar on Maxwell)

सचिनच नाही, तर इतरही अनेक माजी खेळाडूंनी ग्लेन मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे. इंग्लिश फलंदाज मायकेल वॉननं लिहिलंय की, ‘एकदिवसीय क्रिकेटमधील ही एक अजरामर खेळी असेल. नुसतं बघतानाही दडपण जाणवत होतं,’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.