- ऋजुता लुकतुके
श्रीनगर शहरात सध्या एक वेगळीच हलचल आहे. एकतर हे शहर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचं आवडतं पर्यटन शहर आहे. आणि दुसरं यावेळी सचिन एका वेगळ्याच मूडमध्ये आहे. आणि रस्त्यावर थांबून क्रिकेटशी संबंधित लोकांच्या गाठी भेटी घेतोय. गुरुवारी जम्मूला जाताना त्याने वाटेत थांबून एका बॅटच्या कारखान्याला भेट दिली होती. शुक्रवारी सचिन कार थांबवून चक्क रस्त्यावरील मुलांशी क्रिकेट खेळला. (Sachin Tendulkar Plays Cricket in Kashmir)
या लुटुपुटूच्या सामन्याचा व्हिडिओ सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘मला आऊट करून दाखवा,’ असं आव्हानच सचिनने सुरुवातीला या मुलांना दिलं. मुद्दाम उलट्या बॅटने खेळण्याचं धारिष्ट्य दाखवलं. आणि मग तो खोक्याच्या यष्ट्यांसमोर फलंदाजीसाठी उभा राहिला. विशेष म्हणजे एकाही गोलंदाजाला सचिनला बाद करता आलं नाही. उलट सचिनने त्यांना ड्राईव्हचे फटके लगावले. सचिनने शेअर केलेला व्हिडिओ पाहूया, (Sachin Tendulkar Plays Cricket in Kashmir)
Cricket & Kashmir: A MATCH in HEAVEN! pic.twitter.com/rAG9z5tkJV
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 22, 2024
(हेही वाचा – Manohar Joshi : मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार)
सचिनने काश्मीरमध्ये क्रिकेटचा आनंदही लुटला
‘काश्मीर व क्रिकेट! स्वर्गात रंगलेला एक सामना!!’ असा मथला सचिनने या पोस्टला दिला आहे. सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजली आणि मुलगी साराबरोबर सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. गुरुवारी त्याने अमनसेतूलाही भेट दिली होती. तिथे सचिनने भारतीय जवानांबरोबर एक तास घालवला. (Sachin Tendulkar Plays Cricket in Kashmir)
तिथे जाताना सचिन वाटेत चुरसू या ठिकाणी एक बॅटचा कारखाना पाहण्यासाठी थांबला होता. तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी तो एक सुखद धक्का होता. आणि सचिनने त्यांना आपली पहिली क्रिकेट बॅट काश्मीरची असल्याचं सांगितलं. त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये तो पहलगामलाही कुटुंबीयांबरोबर गेला होता.(Sachin Tendulkar Plays Cricket in Kashmir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community