भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्याच उंची आणि मापाचा पुतळा मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर विराजमान झाला आहे. (Sachin Tendulkar Statue) भारत आणि श्रींलकेदरम्यानचा सामना पूर्वी एक दिवस आधी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. वानखेडे स्टेडिअमवरील सचिन तेंडुलकर स्टँड जवळच हा पुतळा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. (Sachin Tendulkar Statue)
सचिन त्याचा प्रसिद्ध ड्राईव्हचा फटका मारत असतानाची ही मुद्रा आहे. आणि हा फटका खेळल्यानंतरचा सचिन यात दिसतो आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात सचिन तेंडुलकरने आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. तेव्हाच मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याचा पुतळा स्टेडिअममध्ये उभारण्याचा ठराव संमत केला होता. (Sachin Tendulkar Statue)
(हेही वाचा – Maratha Reservation : राष्ट्रवादीकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; भाजपने केला पलटवार)
हा पुतळा तुम्ही इथं पाहू शकता.
#WATCH | Maharashtra | Final touches being given to the statue of Cricket legend Sachin Tendulkar at Wankhede Stadium. The statue has been installed by MCA (Maharashtra Cricket Association) near Sachin Tendulkar Stand at the stadium. The statue is dedicated to the 50 years of his… pic.twitter.com/w1BmTJNsuJ
— ANI (@ANI) October 31, 2023
आता या पुतळ्याला मूर्त रुप आलं आहे. मंगळवारी पुतळ्याच्या अनावरणासाठी सचिन आणि त्याचे कुटुंबीय होते. शिवाय भारत आणि श्रीलंकेचे क्रिकेट संघ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार, बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे आणि अजिंक्य नाईक असे मान्यवर हजर होते.
अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा बनवला आहे. सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीला मानवंदना देण्याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा हा प्रयत्न असल्याचं अध्यक्ष अमोल काळे यांनी म्हटलं आहे. योगायोग म्हणजे याच मैदानावर सचिन नोव्हेंबर २०१३ ला आपली शेवटची आंतरराष्ट्रीय खेळी खेळला होता. त्या गोष्टीलाही याच महिन्यात दहा वर्षं पूर्ण होत आहेत. आणि त्याचवेळी सचिनचा पुतळा इथं उभा राहिला आहे. (Sachin Tendulkar Statue)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community