आयपीएलच्या ६ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (१५ डिसेंबर) धक्कादायक निर्णय घेतला. रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आले. या निर्णयामुळे सोशल मिडियावर मुंबई इंडियन्स ट्रेंडिंगवर असूनही तासाभरातच लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली.
एकीकडे हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यानंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Xवर मुंबई इंडियन्सचे ४ लाख, तर इन्स्टाग्रामचे १ लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. यावरून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा मुंबई इंडियन्स संघाने घेतलेला निर्णय चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही तसेच मुंबई इंडियन्सच्या अकाउंटवर व्हिडियोखाली चाहते अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड चालवत असल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – What Next For Rohit? मुंबई इंडियन्सने जे केलं ते बीसीसीआय करेल का?)
तर दुसरीकडे आता सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील मुंबई इंडियन्स संघाच्या मेन्टॉर पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या एक मजकूर व्हायरल होत आहे.
Breaking News🚨
Sachin Tendulkar stepped down from mentor role of Mumbai Indians [ Cricbuzz]
RIP MUMBAI INDIANS
Thoughts?
#IPL2024 #iplauction2024 #RohitSharma #MumbaiIndians #SachinTendulkar #ViratKohli𓃵 #INDvsSA #AUSvsPAK pic.twitter.com/v3jv4gnQXb— Nandha (@BcaNandha) December 17, 2023
व्हायरल झालेला मजकूर
“मुंबई इंडियन्स कुटुंबाचा एक भाग असणे हा एक मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. संघासोबतच्या माझ्या सहवासातील प्रत्येक क्षणाचा मी (Sachin Tendulkar) आनंद घेतला आहे, जे माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखे आहे. मात्र, काही वैयक्तिक बांधिलकीमुळे मी या भूमिकेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मालक, व्यवस्थापन, प्रशिक्षक, खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आगामी हंगामासाठी आणि त्यापुढील सामन्यांसाठी मी संघाला शुभेच्छा देतो.”
(हेही वाचा – Hardik Replaces Rohit : हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यावर मुंबई इंडियन्सनी रोहीत शर्माला काय संदेश दिला?)
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्ससाठी ७८ सामन्यांत २३३४ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 विजेतेपदासाठी संघाचे नेतृत्व केले.
(हेही वाचा – PM Narendra Modi : लाखो तरुणांसाठी सुरत ड्रीम सिटी शहर बनले – पंतप्रधान मोदी)
एक मार्गदर्शक म्हणून त्याने (Sachin Tendulkar) इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर आणि जसप्रित बुमराह यांसारख्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community