Sachin Tendulkar With Afghan Team : सचिन तेंडुलकरने घालवला अफगाणिस्तान संघाबरोबर वेळ

अफगाणिस्तानचा संघ सध्या ७ सामन्यांमध्ये ८ गुणांवर आहे आणि उर्वरित सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी त्यांना आहे. स्पर्धेतील अशा महत्त्वाच्या वळणावर साक्षात सचिन तेंडुलकरने संघाबरोबर काही क्षण धालवले आणि त्यांना पेप टॉक दिला.

115
Sachin Tendulkar With Afghan Team : सचिन तेंडुलकरने घालवला अफगाणिस्तान संघाबरोबर वेळ
Sachin Tendulkar With Afghan Team : सचिन तेंडुलकरने घालवला अफगाणिस्तान संघाबरोबर वेळ
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तानचा संघ सध्या ७ सामन्यांमध्ये ८ गुणांवर आहे आणि उर्वरित सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी त्यांना आहे. स्पर्धेतील अशा महत्त्वाच्या वळणावर साक्षात सचिन तेंडुलकरने संघाबरोबर काही क्षण धालवले आणि त्यांना पेप टॉक दिला. (Sachin Tendulkar With Afghan Team)

अफगाणिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आहे. मंगळवारी या सामन्यापूर्वी अफगाण संघाला भेटण्यासाठी वानखेडे मैदानावर हजेरी लावली मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने. अफगाण खेळाडू या भेटीमुळे हरखून गेले. (Sachin Tendulkar With Afghan Team)

सचिन या विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छा दूत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघाने देशातील विपरित परिस्थितीतही क्रिकेट जिवंत ठेवल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन म्हणून सचिनचा हा ‘पेप टॉक’ आयोजित करण्यात आला होता. सोमवारी संघाचा सराव संपल्यानंतर सचिनने खेळाडूंबरोबर काही वेळ घालवला आणि क्रिकेटवर त्यांच्याशी गप्पाही मारल्या. (Sachin Tendulkar With Afghan Team)

सचिनने खेळाडूंबरोबर फोटोही काढले. अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत चार विजय मिळवून उपांत्य फेरीचे दरवाजे ठोठावत आहे. उर्वरित दोन्ही सामने त्यांनी जिंकले तर त्यांची आगेकूच निश्चित आहे आणि एक विजय मिळवला तरी सरस रनरेटच्या आधारे पुढे जाण्याची संधी त्यांना आहे. (Sachin Tendulkar With Afghan Team)

(हेही वाचा – Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाच्या फेसबुक ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल)

अर्थात, संघाचे विजय त्यासाठी मोठे असायला हवेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा तगड्या संघांशी दोन हात करण्यापूर्वी सचिन तेंडुलकर बरोबर वेळ घालवण्याची संधी अफगाण खेळाडूंनी साधली. ‘सचिन या खेळातील दिग्गज खेळाडू आहे. आमच्यातील कितीतरी जणांचा तो आदर्श खेळाडू आहे. अशावेळी त्याचं क्रिकेटवर मार्गदर्शन मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,’ अस अफगाण संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी म्हणाला. (Sachin Tendulkar With Afghan Team)

सचिन तेंडुलकरसाठी मुंबईत येणारा आंतरराष्ट्रीय संघ, मुंबईचा रणजी संघ यांना भेटणं ही नियमित गोष्ट आहे. तो आवर्जून ड्रेसिंग रुममध्ये जातो आणि खेळाडूंशी गप्पा मारतो. यावेळी मात्र काही अफगाण खेळाडूंनी सचिनला भेटण्याची इच्छाच व्यक्त केली होती. (Sachin Tendulkar With Afghan Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.