स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) खासियत. याचेच धडे नवीन खेळाडूंनी घ्यावे यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिनचा २२ फूट उंच पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
नुकताच मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी येत्या १ नोव्हेंबरला या पुतळ्याचे उदघाटन होणार असल्याचे सांगितले आहे. २ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भारत-श्रीलंका विश्वचषकचा सामना होणार असून या सामन्याच्या एकदिवस आधीच (Sachin Tendulkar) सचिनच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र या कार्यक्रमाची वेळ अजून ठरली नसल्याची माहिती एमसीएने दिली आहे.
(हेही वाचा – Chandrakant Patil : नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध)
या पुतळ्याविषयी काळे यांनी सांगितले की, ‘ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची विशेष ओळख असणाऱ्या स्ट्रेट ड्राईव्ह या शॉर्टच्या शैलीतील हा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्यांच्या नावाने असलेल्या स्टँडच्या बाजूला याचे अनावरण होणार असून, हा पुतळा चबुतऱ्यासह एकूण २२ फूट उंचीचा आहे. ‘विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला असून सध्या हा संपूर्ण पुतळा झाकण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community