Saina Nehwal : ‘या’ आजारामुळे सायना नेहवाल करतेय निवृत्तीचा विचार 

Saina Nehwal : गगन नारंग पॉडकास्टमध्ये सायनाने या आजाराचा खुलासा केला आहे 

105
Saina Nehwal : ‘या’ आजारामुळे सायना नेहवाल करतेय निवृत्तीचा विचार 
Saina Nehwal : ‘या’ आजारामुळे सायना नेहवाल करतेय निवृत्तीचा विचार 
  • ऋजुता लुकतुके

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला संधिवात त्रास देत असून त्यामुळे तिचे खांदे दुखत असल्याचं तिने नुकतंच सांगितलं आहे. तिने स्वत: याबाबत खुलासा करताना वर्षअखेर खेळातून निवृत्ती घेण्याचा विचार मनात डोकावत असल्याचंही तिने म्हटलं आहे. सायना नेहवाल (Saina Nehwal) ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तसेच सायनाने २०१० आणि २०१८ मध्ये राष्ट्रकूल खेळांतही सुवर्ण जिंकलं आहे.

(हेही वाचा- Paris Paralympic Games : सुमित अंतिलला पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण, स्वत:चाच विक्रम मोडला)

सायना म्हणाली की, तिला आता खेळणे अवघड झाले आहे, ‘हे खरे आहे. माझी कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. सध्या गुडघ्याची स्थितीही चांगली नाहीय. संधीवाताचा देखील त्रास सुरु आहे. त्यामुळे मला ७-८ तास सरावात गुंतून राहणे आता शक्य नाही. विजय मिळवण्यासाठी फक्त २ तासांचा सराव पुरेसा नाहीय. त्यामुळे मी निवृत्तीचा विचार करतेय. निवृत्तीचा काय परिणाम होणार, हे देखील बघावं लागेल,’ असं सायनाने सांगितले. (Saina Nehwal)

खेळाडूची कारकीर्द फार छोटी असते. मी वयाच्या नवव्या वर्षी कोर्टवर आले. पुढच्या वर्षी ३५ वर्षांची होईन. माझी कारकीर्द लांबलचक राहिली याचा गर्व आहे. जे काही मिळविले, त्याविषयी आनंदी आहे. वर्षअखेरपर्यंत दुखापतींची परीक्षा करत राहणार आहे. ऑलिम्पिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी तीन ऑलिम्पिक खेळले पण सलग दोन ऑलिम्पिकला मुकले याचीही खंत आहे. मी जे सामने खेळले त्यात शंभर टक्के योगदान दिल्याचा आनंद आणि गर्व वाटतो. असे पद्मश्री पुरस्कारप्राप्त सायनाने सांगितले. (Saina Nehwal)

(हेही वाचा- BoycottNetflix का होतंय ट्रेंड? ‘Netflix’ला केंद्र सरकारची नोटीस! काय आहे कारण?)

बॅडमिंटनपटू सायना नेहवालने (Saina Nehwal) अनेक मोठे विक्रम आपल्या नावार केले आहेत. सायनाचे आई-वडीलदेखील बॅडमिंटन खेळाडू होते. सायनाने हैदराबादच्या एलबी स्टेडियमधून  बॅडमिंटनची ट्रेनिंग घेतली. सायनाने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त एसएम आरिफ यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे घेतले. आणि त्यानंतर ती पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ लागली. सायनानेच भारताला बॅडमिंटनचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. सायना नेहवालला २००९-१० मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, २०१० मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभुषण या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. सायनाने २००९ मध्ये इंडोनेशिया ओपनचे जेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय होती. याशिवाय सायनाने २०१० मध्ये सिंगापूर ओपन, इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, हाँग काँग सुपर सीरीज यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. (Saina Nehwal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.