Sairaj Bahutule Quits : साईराज बहुतुलेचा क्रिकेट अकादमीतून राजीनामा

22
Sairaj Bahutule Quits : साईराज बहुतुलेचा क्रिकेट अकादमीतून राजीनामा
Sairaj Bahutule Quits : साईराज बहुतुलेचा क्रिकेट अकादमीतून राजीनामा
  • ऋजुता लुकतुके

भारताचा आणि मुंबईचा माजी फिरकीपटू साईराज बहुतुलेनं बीसीसीआयच्या बंगळुरूतील क्रिकेट अकादमीतील गोलंदाजीचा प्रशिक्षक हे पद सोडलं आहे. शुक्रवार ३१ जानेवारी हा त्याचा शेवटचा कामाचा दिवस होता. घरगुती कारणांमुळे हे पद सोडत असल्याचं बहुतुलेनं म्हटलं आहे. २०२१ पासून साईराज बहुतुले क्रिकेट अकादमीत कार्यरत होता. राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण क्रिकेट अकादमीचे प्रमुख असताना बहुतुलेनं दोघांच्या हाताखाली काम केलं. आणि त्याच्या कारकीर्दीत अनेक नवीन खेळाडू भारतीय संघात उदयास आले. (Sairaj Bahutule Quits)

(हेही वाचा- Budget 2025 : नव्या वर्षात सोनं-चांदी स्वस्त होणार ? आर्थिक सर्वेक्षण अहवाल काय सांगतो ?)

‘मी मुंबईत परततोय हे खरं आहे. घरगुती कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आहे. पण, इथं काम करण्याची संधी मला मिळाली. आणि राहुल द्रविड, लक्ष्मण यांनी कामाचं स्वातंत्र्य मला दिलं याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. भारतीय संघ, भारतीय ए संघ तसंच १९ वर्षांखालील भारतीय संघाबरोबर मी एकूण २० दौरे केले. आणि हा कालावधी कायम आठवणीत जपण्यासारखा आहे,’ असं बहुतुलेनं बोलून दाखवलं आहे. (Sairaj Bahutule Quits)

भारताने एकदिवसीय विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा साईराज बहुतुले संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर होता. तर १९ वर्षांखालील विश्वचषकात शेवटच्या दोन स्पर्धांमध्ये त्याने युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. गेल्यावर्षी इंडिया इमर्जिंग संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही तो ओमान इथे झालेल्या स्पर्धेत संघाबरोबर सहभागी झाला होता. तर श्रीलंकेत गेल्यावर्षी झालेल्या मालिकेतही तो भारतीय सीनिअर संघाबरोबर होता. फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये झालेल्या बोर्डर – गावसकर मालिकेतही तो भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक होता. (Sairaj Bahutule Quits)

(हेही वाचा- अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्या साडीवर मधुबनी कला ; काय असेल अर्थसंकल्पाशी खास कनेक्शन ?)

साईराज भारताकडून २ कसोटी आणि ८ एकदिवसीय सामने खेळला आहे. कसोटींत त्याच्या नावावर ५ बळी आहेत. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये मात्र त्याने १८८ कसोटींत एकूण ६३० बळी मिळवले आहेत. आणि ६,१७६ धावाही केल्या आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात महत्त्वाची भूमिका बजावताना तो दिसू शकतो. (Sairaj Bahutule Quits)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.