Sairaj Bahutule : साईराज बहुतुले श्रीलंका दौऱ्यात करणार गोलंदाजांना मार्गदर्शन 

Sairaj Bahutule : गौतम गंभीरचा सपोर्ट स्टाफ अजूनही ठरलेला नसल्याने तात्पुरती ही सोय करण्यात आलीय 

119
Sairaj Bahutule : साईराज बहुतुले श्रीलंका दौऱ्यात करणार गोलंदाजांना मार्गदर्शन 
Sairaj Bahutule : साईराज बहुतुले श्रीलंका दौऱ्यात करणार गोलंदाजांना मार्गदर्शन 
  • ऋजुता लुकतुके

मंगळवारी भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होईल तेव्हा प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत (Gautam Gambhir) अभिषेक नायर (Abhishek Nair), रायन टेन ड्युसकाटे आणि साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) असा सपोर्ट स्टाफ असेल. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून टी दिलीप यांची निवड तर आधीच पक्की झाली होती. गौतम गंभीरचा सपोर्ट स्टाफ अजून ठरलेला नाही. पण, तोपर्यंत बीसीसीआयने ही तात्पुरती सोय केली आहे.

(हेही वाचा- Amit Shah यांची आधी शरद पवारांवर कडाडून टीका; आज Ajit Pawar यांना फोन)

साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) बंगळुरू इथं क्रिकेट अकादमीत गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम करतो. भारताच्या अ संघाबरोबर सध्या तो काम करत आहे. क्रिकेट अकादमीत राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्या मागून व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (V.V.S. Laxman) प्रमुख म्हणून काम करत असताना दोघांबरोबर बहुतुलेनं गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.

साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) माजी फिरकीपटू असून १९९७ ते २००३ या कालावधीत तो भारतीय संघासाठी २ कसोटी आणि ८ एकदिवसीय सामने खेळला आहे. कसोटीत ५ आंतरराष्ट्रीय बळी त्याच्या नावावर आहेत. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १८८ सामन्यांत तब्बल ६३० बळी मिळवले आहेत. तर अष्टपैलू खेळाडू असलेल्या बहुतुलेनं ६,१४७ धावाही केल्या आहेत.

(हेही वाचा- Women’s Asia Cup 2024 : युएईवर मोठा विजय मिळवत भारताची उपान्त्य फेरीत धडक )

त्याच्या संघाबरोबर असण्यामुळे अक्षर पटेल (Akshar Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांना फायदाच होणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादवलाही त्याच्याबरोबर सराव करता येईल. ५१ वर्षीय बहुतुलेनं प्रशिक्षक म्हणूनही चांगली कारकीर्द घडवली असून राजस्थान रॉयल्स संघाचा तो गोलंदाजी प्रशिक्षक आहे. तर केरळ, विदर्भ, गुजरात आणि गोवा या संघांचं प्रशिक्षक पदही त्याने भूषवलं आहे. (Sairaj Bahutule)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.