-
ऋजुता लुकतुके
नेपाळचा लोकप्रिय क्रिकेटपटू संदीप लामिछानेची तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून सुटका केली आहे. एका १८ वर्षीय नेपाळी महिलेनं संदीपवर बलात्काराचा आरोप केला होता. आणि या प्रकरणी खालच्या न्यायालयाने तो दोषी असल्याचा निर्वाळाही दिला होता. पण, संदीप वरच्या न्यायालयात ही लढाई लढला. आणि अखेर निकाल त्याच्याबाजूने लागला आहे. २३ वर्षीय लामिछाने नेपाळ संघाचा राष्ट्रीय कर्णधारही आहे. याचवर्षी जानेवारी महिन्यात लैंगिक अत्याचार आणि बळजबरी यासाठी खालच्या न्यायालयाने त्याला ८ वर्षांची शिक्षा सुनावली होती. (Sandeep Lamichhane Acquitted)
नेपाळमधील हा फिरकीपटू भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० लीग खेळला आहे. आणि अशी कामगिरी करणारा नेपाळमधील तो पहिला क्रिकेटपटू होता. २०२२ मध्ये काठमांडू पोलिसांनी एका महिलेच्या आरोपांवरून त्याला अटक केली होती. या महिलेनं लैंगिक अत्याचारांबरोबरच हिंसाचाराचा आरोपही केला होता. (Sandeep Lamichhane Acquitted)
(हेही वाचा – Mumbai Crime : ‘कॅफे म्हैसूर’ च्या मालकाला लुटणाऱ्या पोलिसांसह ६ जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी)
पोलिसांनी लामिछाने विरुद्ध कारवाई सुरू करून गुन्हा दाखल केला. मधल्या काळात तो जामिनावर सुटला होता. खालच्या न्यायालयाने पोलिसांचे दावे उचलून धरत त्याला ८ वर्षांचा कारावास आणि ३,७४५ अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला होता. तर महिलेला नुकसान भरपाई देण्याचा आदेशही त्याला देण्यात आला होता.
पण, लामिछाने आपण निर्दोष असल्याचं सांगत वरच्या न्यायालयात अपील केलं. त्याचा निकाल बुधवारी त्याच्या बाजूने लागला आहे. निकाल वाचनाच्या वेळी लामिशेन न्यायालयात हजर होता. आणि त्याच्या पाठिराख्यांनी नेपाळी वाद्य वाजवत आनंद साजरा केला. (Sandeep Lamichhane Acquitted)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community