- ऋजुता लुकतुके
नेपाळचा स्टार फलंदाज संदीप लमिशेनला (Sandeep Lamichhane) अमेरिकेनं व्हिसा नाकारल्याचं त्याने स्वत:च बुधवारी उघड केलं आहे. त्यामुळे बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा संदीपचा प्रयत्न सध्या तरी फसलाय. टी-२० विश्वचषकाकडे तो आशेनं बघत होता. २३ वर्षीय लमिशेनवर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले होते. २०१८ साली झालेल्या या आरोपांनंतर तो आधी अटकेत होता. मग त्याची जामिनावर सुटका झाली असली तरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. (Sandeep Lamichhane)
गेल्याच आठवड्यात नेपाळमधील न्यायालयाने या आरोपातून त्याची मुक्तता केली. त्यामुळे आता तो क्रिकेटमध्ये परतू शकतो. पण, एकदा व्हिसा नाकारल्यावर परत ती प्रक्रिया करण्या इतका वेळ आता त्याच्याकडे नाही. यापूर्वीही २०१९ मध्ये लमिशेनला कॅरेबियन बेटांवरील एका लीगमध्ये खेळायचं होतं आणि ते सामनेही अमेरिकेत होणार होते. पण, तेव्हाही त्याला अमेरिकन व्हिसा नाकारण्यात आला होता. (Sandeep Lamichhane)
And the @USEmbassyNepal did it again what they did back in 2019, they denied my Visa for the T-20 World Cup happening in USA and West Indies. Unfortunate. I am sorry to all the well wishers of Nepal Cricket. @USAmbNepal @CricketNep. https://t.co/xdBhaY6G91
— Sandeep Lamichhane (@Sandeep25) May 22, 2024
(हेही वाचा – ‘काँग्रेसचं सरकार ७ जन्मात येणार नाही’; हरयाणामधून PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर हल्लाबोल)
लमिशेन नावावर इतके बळी
‘जे त्यांनी २०२९ मध्ये केलं, तेच त्यांनी २०२४ मध्येही माझ्याबरोबर केलं आहे. मला अमेरिकन व्हिसा दुसऱ्यांदा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारी विश्वचषक टी-२० स्पर्धा मी खेळू शकणार नाही. नेपाळ क्रिकेटचे पाठिराखे आणि हितचिंतक यांची मी माफी मागतो,’ असं लमिशेनने आपल्या संदेशात म्हटलं आहे. (Sandeep Lamichhane)
नेपाळचा संघ आपली दुसरी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. त्यांचा समावेश दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यासह डी गटात झाला आहे. लमिशेन (Sandeep Lamichhane) ऐवजी राहुल पोडेल या अष्टपैलू खेळाडूचा आता नेपाळ संघात समावेश करण्यात आला आहे. लमिशेनने ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११२ बळी मिळवले आहेत. तर टी-२० प्रकाराताही तो १०० बळींच्या जवळ आहे. ५२ टी-२० सामन्यांत त्याच्या नावावर ९८ बळी आहेत. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडूनही खेळला आहे. (Sandeep Lamichhane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community