Sanju Samson : संजू सॅमसनचा ११० मीटर लांब षटकार पाहिलात?

Sanju Samson : झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात सॅमसनने ५८ धावा केल्या 

987
Sanju Samson : संजू सॅमसनचा ११० मीटर लांब षटकार पाहिलात?
Sanju Samson : संजू सॅमसनचा ११० मीटर लांब षटकार पाहिलात?
  • ऋजुता लुकतुके

झिम्बाब्वेविरुद्धचा पाचवा आणि मालिकेतील शेवटचा टी-२० सामना संजू सॅमसनच्या (Sanju Samson) ५८ धावांच्या खेळीसाठी लक्षात राहील. या खेळीदरम्यान त्याने मारलेल्या उत्तुंग आणि मैदानाबाहेर गेलेल्या षटकाराची आठवणही नियमितपणे काढली जाईल. ब्रँडन मवुताचा (Brandon Mavuta) हा चेंडू सॅमसनने आधी पॅव्हेलियनच्या छपरावर आणि टप्पा पडून थेट मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला. ४५ चेंडूंत ५८ धावांची त्याची खेळी आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar), शिवम दुबेनं (Shivam Dube) त्याला गोलंदाजीत दिलेली साथ यामुळे भारतीय संघाने झिंबाब्वेचा ४२ धावांनी पराभव केला.

(हेही वाचा- पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा उद्देश; महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर Jayant Patil यांची टीका)

तर भारतीय संघाने ही मालिका ४-१ ने जिंकली. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी अनियमित उसळी आणि वेग असलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला इथं फलंदाज चाचपडतात. अख्ख्या मालिकेत फलंदाजांची परीक्षा या खेळपट्टीने पाहिली आहे. पण, जम बसल्यावर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), यशस्वी जायसवाल आणि शुभमन यांनी मोठी खेळीही साकारली आहे. रविवारचा दिवस संजू सॅमसनचा होता. ४५ चेंडूंच्या आपल्या डावात त्याने ४ षटकार ठोकले. रियान परागबरोबर केलेल्या ६५ धावांच्या भागिदारीमुळे भारताने १६५ धावांचा टप्पा ओलांडला. (Sanju Samson)

यात मवुताला मारलेला षटकार एकदा पाहूया.

 झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यातील अपवाद सोडला तर भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. अभिषेक शर्माने मालिकेतील एकमेव शतक झळकावलं. तर त्या खालोखाल यशस्वी जायसवालने (Yashasvi Jaiswal) नाबाद ९३ धावा केल्या. अख्ख्या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन (Shubman Gill) दिल पाच सामन्यांत १७० धावा करून आघाडीवर राहिला. तर तर यशस्वी जयसवालने त्या खालोखाल ३ सामन्यांत १४१ धावा केल्या. झिम्बाब्वेच्या डियॉन मायर्सने १३४ धावा केल्या. (Sanju Samson)

(हेही वाचा- Ind vs Zim 5th T20 : पाचवा टी-२० सामना जिंकून भारताने मालिकाही ४-१ ने जिंकली )

मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या दोघांनी प्रत्येकी ८ बळी टिपत गोलंदाजीत वर्चस्व गाजवलं. अष्टपैलू कामगिरीमुळे वॉशिंग्टन सुंदरला मालिकावीर किताब मिळाला. (Sanju Samson)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.