- ऋजुता लुकतुके
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स दरम्यानचा सामना रोमांचक होता. आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने ८६ (Sanju Samson Wicket) धावांच्या खेळीने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सामन्यात रंगत आणली. त्याच्या या खेळीपेक्षा चर्चा जास्त रंगली ती त्याच्या बाद होण्याची. ८६ धावांवर असताना सीमारेषेवर शाय होपने त्याचा झेल पकडला. पण, रिप्लेमध्येही होपने झेल पकडल्यावर सीमारेषेवरील दोरीला पाय लावला नाही ना याची खात्री वाटत नव्हती. तिसऱ्या पंचांनी मात्र तो झेलबाद असल्याचा निर्वाळा दिला. (Sanju Samson Wicket)
(हेही वाचा- Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी)
संजू सॅमसन पंचांच्या (Sanju Samson Wicket) निर्णयावरून तंबूच्या दिशेनं परत चालला होता. पण, त्याच्या संघ सहकाऱ्यांनी रिप्ले बघून त्याला मैदानातच थांबायला सांगितलं. आणि त्यामुळे सॅमसननेही मैदानावर काही काळ पंचांशी वाद घातली. या कृत्यासाठी त्याच्या मानधनातील ३० टक्के रक्कम कापून घेण्याची कारवाईही त्याच्यावर झाली. इतकं सगळं नाट्य सामन्यात घडलं असताना आणि अजूनही संजू सॅमसन बाद नव्हता, असा काहींचा समज असताना, एक नवीन व्हीडिओ समोर आला आहे. आणि यात काय दिसतंय ते पाहूया. स्टार स्पोर्ट्स या अधिकृत टीव्ही प्रक्षेपण वाहिनीवर या नवीन व्हीडिओवर चर्चाही झाली. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडीने (Tom Moody) हा नियम समजावून सांगितला. (Sanju Samson Wicket)
Out or Not Out!? 🤔
Here’s a closer look at why #SanjuSamson was given out last night v Delhi Capitals – a moment which changed the course of the match. @TomMoodyCricket and @jatinsapru dissected each and every replay available to demonstrate why the third umpire made the… pic.twitter.com/xZeySOSmd4
— Star Sports (@StarSportsIndia) May 8, 2024
शाय होपने झेल पकडल्यानंतर त्याचा तोल गेला हे खरंच. पण, त्यानंतरही तो सावध होता. आणि त्याचा पाय दोरीला लागला असता तर दोरीवर लावलेला त्रिकोणी स्पंज थोडातरी हलला असता. पण, तो जराही हललेला दिसला नाही. अशा युक्तिवाद स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील कार्यक्रमात टॉम मूडी यांनी केला. शिवाय व्ही़डिओ जवळून पाहता पाय आणि दोरी यात किमान अर्ध्या इंचाचं अंतर असल्याचं दिसतंय, असंही मूडी यांचं म्हणणं होतं. पण, तो झेलाची घटना घडली तेव्हा याच वाहिनीवर समालोचन करत असलेले माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांनी हा झेल नसल्याचं म्हटलं होतं. (Sanju Samson Wicket)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community