-
ऋजुता लुकतुके
अलीकडेच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर संजू सॅमसन आता कसोटीतही नशीब आजमावण्यासाठी तयार झाला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक विरुद्धचा सामना तो केरळकडून खेळणार आहे. १८ ऑक्टोबरला कर्नाटक विरुद्ध केरळ असा रणजी सामना होणार आहे. संजू सॅमसनने केरळचे निवड समिती अध्यक्ष पी प्रशांथ यांना फोनवरून आपली उपलब्धता कळवली आहे. ‘संजूने मला फोन करून तो आगामी सामन्यासाठी तयार असल्याचं मला कळवलं आहे. त्यामुळे अर्थातच तो १८ तारखेचा सामना खेळणार आहे,’ असं प्रशांत म्हणाले. (Sanju Samson)
(हेही वाचा- राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन जाण्याचा विचार – Rohit Sharma)
केरळने या आधीचा सामना पंजाब विरुद्ध ७ गडी राखून जिंकला आहे. आता १८ तारखेला अलूर इथं ते कर्नाटशी दोन हात करणार आहेत. संजू सॅमसनच्या समावेशामुळे संघाला नवीन ताकद मिळाली आहे. संघाचं नेतृत्व मात्र सचिन बेबीच करणार आहे. सचिनची हंगामापूर्वीच नेतृत्वासाठी निवड झाली होती. त्यामुळे नेतृत्वात सातत्य राखण्याच्या दृष्टीने आताही सचिव बेबीच संघाचं नेतृत्व करेल, असं प्रशांथ यांनी स्पष्ट केलं. (Sanju Samson)
संजू अलीकडेच दुलिप करंडकातही खेळला होता. भारतीय ड संघाकडून खेळताना त्याने १ शतक आणि दोन सामन्यात ४० च्या वर धावा केल्या. तीनही सामन्यात त्याने यष्टीरक्षणही केलं. पण, आता केरळसाठी ही जबाबदारी तो निभावेल का हे अजून स्पष्ट नाही. ‘सामन्या दरम्यान तो यष्टीरक्षण करेल का हा प्रश्न कर्णधार आणि प्रशिक्षकांचा आहे. तो संघाचा निर्णय असेल,’ असं निवड समितीचे अध्यक्ष असलेले प्रशांथ म्हणाले. (Sanju Samson)
रणजी हंगामात केरळ संघाचा समावेश सी गटात आहे. या गटात त्यांच्याबरोबर कर्नाटक, बंगाल, हरयाणा, बिहार, मध्यप्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश हे संघ आहेत. पंजाब विरुद्धच्या पहिल्या विजयामुळे सध्या केरळचा संघ जोशात आहे. या हंगामापूर्वी केरळने भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळलेला तामिळनाडूचा बाबा अपराजीतबरोबर करार केला आहे. तो केरळचा मुख्य तेज गोलंदाज आहे. (Sanju Samson)
(हेही वाचा- Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्त स्पष्टच म्हणाले, एक्झिट पोलवर आत्मपरीक्षणाची गरज)
केरळचा रणजी संघ –
संजू सॅमसन, सचिन बेबी (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दिन, विष्णू विनोद, के एम आसिफ, बेसिल थंपी, बाबा अपराजित, जलज सक्सेना, आदित्य सरवटे, एम निधिश, अक्षय चंद्रन, फेझिल फनूस, वत्सल गोविंद, कृष्णा प्रसाद, रोहन कुन्नुमल, सलमान निझार व बेसिल एनपी (Sanju Samson)
हेही पहा-