Sanskrit Commentary : कर्नाटकमधील सामन्यात संस्कृत समालोचनाची चर्चा, आयपीएलमध्येही संस्कृतची मागणी

67
Sanskrit Commentary : कर्नाटकमधील सामन्यात संस्कृत समालोचनाची चर्चा, आयपीएलमध्येही संस्कृतची मागणी
Sanskrit Commentary : कर्नाटकमधील सामन्यात संस्कृत समालोचनाची चर्चा, आयपीएलमध्येही संस्कृतची मागणी
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमुळे (IPL) क्रिकेट लीगला दर्जा प्राप्त झाला आणि त्याचवेळी बीसीसीआयने (BCCI) क्रिकेट सादरीकरणही प्रादेशिक स्तरावरही दर्जेदार बनवलं. गेल्या १६ वर्षांत बीसीसीआयने १२ प्रादेशिक भाषांमध्ये सामन्यांचं सादरीकरण आणि समालोचन सुरू केलं. हिंदी, मराठी, तामिळ, कन्नडा, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये आयपीएलचे कार्यक्रम अधिकृतपणे पार पडतात. या भाषांमध्ये आता भारतातील प्राचीन भाषा संस्कृतचा समावेश झाला तर? (Sanskrit Commentary)

कर्नाटकमध्ये अलीकडेच तसा प्रयोग स्थानिक क्रिकेट सामन्यात झालाही. आणि तो व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोय. कर्नाटक संस्कृत विद्यापीठाने प्रादेशिक भाषांचे पोर्टल स्थायीच्या मदतीने हा उपक्रम राबवला होता. आणि असं समालोचन त्यांनी चित्रित करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे भारतीयांनी हा प्रयत्न चांगलाच उचलून धरला आहे. (Sanskrit Commentary)

(हेही वाचा – ‘…तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता’, नेमकं काय म्हणाले Nitin Gadkari?)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samashti Gubbi (@sanskritsparrow)

(हेही वाचा – Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)

बंगळुरूमध्ये झालेला हा सामना गल्ली क्रिकेटपेक्षा मोठा नव्हता. पण, अरुण कुमार कलगी मैदानातच उभं राहून संस्कृत समालोचन करताना दिसतात. आणि या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून जास्त लोकांनी पसंती दिली आहे. तर १० लाखांच्या वर लोकांनी तो पाहिला आहे. क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळामुळे तसंच डिजिटल माध्यमामुळे भारतातील या प्राचीन भाषेला तरुणांपर्यंत पोहोचवता येईल, असं वाटून कर्नाटक संस्कृत विद्यापीठाने हा प्रयोग केला आहे. (Sanskrit Commentary)

इतकंच नाही तर लोकांनी आयपीएलमध्ये (IPL) संस्कृत समालोचनाचा आग्रहही त्यामुळे धरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.