Sarbjyot Singh : ३ दिवसांपूर्वी पदकाची आशा सोडलेली, आज हातात ऑलिम्पिक पदक

Sarbjyot Singh : सरबज्योत सिंगचा मागचा तीन दिवसांचा कालावधी निराशा आणि आशेच्या खेळाचा ठरला आहे 

216
Sarbjyot Singh : ३ दिवसांपूर्वी पदकाची आशा सोडलेली, आज हातात ऑलिम्पिक पदक
Sarbjyot Singh : ३ दिवसांपूर्वी पदकाची आशा सोडलेली, आज हातात ऑलिम्पिक पदक
  • ऋजुता लुकतुके

‘तुझ्या प्रयत्नांचं चीज झालं,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरबज्योतला म्हणाले तेव्हा एरवी भावना सहजासहजी चेहऱ्यावर न दाखवणारा सरबज्योतही काहीसा भावूक झाला. चेहऱ्यावर मंद स्मित झळकलं. नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र सांघिक कांस्य त्याने जिंकलं होतं. मनू भाकेर (Manu Baker) आणि त्याच्या जोडीने भारताला दुसरं कांस्य पदक मिळवून दिलं होतं. (Sarbjyot Singh)

(हेही वाचा- मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल..!)

पंतप्रधानांनी मनू आणि सरबज्योतची (Sarbjyot Singh) जोडी कशी जमली असा प्रश्न विचारला. सरबज्योतने मागच्या दोन वर्षांचा प्रवासच सांगितला. ‘२०१९ पासून दोघं राष्ट्रीय स्तरावर एकत्र खेळत आहोत. अगदी पहिल्यापासून एकमेकांशी जुळवून घेताना त्रास झाला नाही. त्यामुळे जोडी कायम राहिली. आम्ही एकमेकांशी फारसं बोलत नाही. पण, कामगिरीवर लक्ष ठेवून असतो,’ असं सरबज्योत म्हणाला.

 मनू आणि सरबज्योतचं (Sarbjyot Singh) हे सांघिक यश तर होतंच. सरबज्योतसाठी त्याला किनार होती तीन दिवासांपूर्वीच्या अपयशाची. सरबज्योतचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. तीन दिवसांपूर्वी वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तुल खेळताना त्याची पात्रता फेरी अगदी थोडक्यात हुकली. अगदी ०.०१ इतकं अंतर त्याला कमी पडलं होतं. पण, त्याच दिवशी त्याची मैत्रीण मनू भाकेर महिलांमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्याचं त्याला कळलं. त्यातून सरबज्योतचा हुरुप नक्कीच वाढला. दोघंही २२ वर्षांचे आहेत. एकत्र सराव करतात. सरबज्योतने तिच्याबरोबर सराव सुरू ठेवला. मनूने कांस्य जिंकल्यावर दोघांची मिश्र सांघिकसाठी तयारी आपोआप होत गेली.

‘वैयक्तिक फेरीत हरल्यावर माझा अजिबात मूड नव्हता. ऑलिम्पिकचं स्वप्नच पाहू नये, असं वाटत होतं. सगळं माझ्यासाठी नाही, असा विचार तर अनेकदा आला. पण, मनूचा खेळ बघून स्वत:ला सावरलं. मिश्र दुहेरीत तिला साथ देण्याचं ठरवलं. पदकाच्या फेरीत तिच्या तोडीची कामगिरी करू शकलो, याचा आनंद आहे,’ असं सरबज्योतने सांगितलं. (Sarbjyot Singh)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : जाणून घेऊया भारतीय पथकाचं बुधवारचं वेळापत्रक काय आहे)

सरबज्योत (Sarbjyot Singh) २०१६ पासून रोज २५ किलोमीटर प्रवास करून अंबाला इथं अभिषेक राणा (Abhishek Rana) यांच्या अकॅडमीत शिकायला येत असे. शिवाय दोन वेळचा हा प्रवास त्याला परिस्थितीमुळे बसने करावा लागायचा. पण, घरची गरिबी असली तरी परदेशात असलेले आजोबा त्याच्या नेमबाजीचा खर्च करत होते. या दोघांच्या विश्वासामुळे सरबज्योत आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकला.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.