Sarfaraz Khan : मुंबईकर सर्फराझ खानने फिरकीवर हुकुमत कशी मिळवली?

अगदी लहान असल्यापासून सर्फराझ दिवसाला किमान १०० चेंडू खेळेल, असा कार्यक्रम नौशाद आखायचे. तेच प्रमाण आता सर्फराझला संघात संधी मिळेपर्यंत दिवसाला ५०० चेंडूंवर गेलं आहे.

210
Sarfaraz Khan : मुंबईकर सर्फराझ खानने फिरकीवर हुकुमत कशी मिळवली?
  • ऋजुता लुकतुके

२५ वर्षीय सर्फराझ खानने पदार्पणाच्या दोन्ही डावांत धुवांधार अर्धशतक झळकावून राजकोट कसोटीवर आपला वेगळा ठसा उमटवला. ज्या पद्धतीने त्याने फिरकीवर वर्चस्व गाजवलं ते तर जाणकारांचीही वाहवा मिळवून गेलं. पण, त्यासाठी सर्फराझने बालपणापासून घेतलेली मेहनत ऐकलीत तर तुमचेही डोळे पांढरे होतील. (Sarfaraz Khan)

कोव्हिडच्या काळातही न थांबलेला सराव आणि दिवसाला ५०० चेंडूंचा सामना करण्याची चिकाटी याला मिळालेलं हे फळ आहे. कोव्हिडमुळे लागलेल्या ब्रेकमध्ये सर्फराझ आपल्या प्रशिक्षक वडिलांबरोबर गाडीने १६०० किलोमीटर फिरला. हेतू हा की, अमरोहा, मुरादाबाद, मीरत, कानपूर, मथुरा आणि डेहरादून इथं आखाड्यांच्या मातीवर क्रिकेट खेळावं. आखाडे माती टाकून बनवलेले असल्यामुळे चेंडू त्यावर पडल्यावर एकत्र बांधलेली माती फुटते. मग चेंडू हातभर वळतो, कधी खाली राहतो तर एखादाच वर उसळतो. पण, त्याचाच तर सर्फराझला सराव करायचा होता! (Sarfaraz Khan)

(हेही वाचा – Pro Hockey League : भारताची स्पेनवर ८-७ ने मात)

नेट्समध्ये फिरकीपटूचे ५०० चेंडू रोज खेळणारा सर्फराझ

या तयारीसाठी सर्फराझचे (Sarfaraz Khan) वडील नौशाद यांनी उत्तर भारतातील प्रचलित प्रशिक्षकांची मदत घेतली. खेळपट्टी तयार करवली आणि त्यावर सराव करून घेतला. फलंदाजीच्या तंत्रामध्ये सातत्याने बदल करण्याची तयारी सर्फराझनेही दाखवली. कानपूरला असताना सर्फराझ (Sarfaraz Khan) कुलदीप यादवला तासनतास खेळला. चायनामन गोलंदाजी त्याने नीट समजून घेतली. सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांनीही सचिनकडून सामन्यांचा सराव करून घेतला होता. ते सचिनला घेऊन मुंबईभर फिरायचे. आणि एका नेट्समधून दुसऱ्या नेट्समध्ये फलंदाजी करायला लावायचे. तेच तंत्र नौशाद यांनी वापरलं. (Sarfaraz Khan)

जेव्हा मुंबईचं क्रिकेट पाऊस किंवा हंगाम संपल्यामुळे बंद असेल तेव्हा सर्फराझ आणि त्याच्या दोन लहान भावांसाठी त्यांनी घराबाहेरच ॲस्ट्रोटर्फची खेळपट्टी बनवली. आणि तिथे बाप-लेकाचा सराव सुरू असायचा. अगदी लहान असल्यापासून सर्फराझ (Sarfaraz Khan) दिवसाला किमान १०० चेंडू खेळेल, असा कार्यक्रम नौशाद आखायचे. तेच प्रमाण आता सर्फराझला संघात संधी मिळेपर्यंत दिवसाला ५०० चेंडूंवर गेलं आहे. (Sarfaraz Khan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.