बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप २०२३ (Badminton Asia Championship) मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कामगिरीने सात्विक-चिराग यांच्या जोडीने तब्बल ५८ वर्षांनंतर बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. इतकंच नाही तर बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे पुरुष दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सात्विक आणि चिराग यांनी इतिहास रचला आहे.
(हेही वाचा – IPL 2023 : टीम डेव्हिड घेणार ‘पोलार्ड’ची जागा?)
दरम्यान, भारतीय बॅडमिंटन (Badminton Asia Championship) संघाने सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना २० लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतील पुरुष दुहेरीसाठी (Badminton Asia Championship) अंतिम सामना रविवारी पार पडला. अंतिम फेरीत सात्विक आणि चिराग जोडीने मलेशियाच्या आंग ये आणि सिन-तोई यी यांच्यावर १६-२१, २१-१७, २१-१९ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिरागने पुनरागमन करत सलग गेममध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
हेही पहा –
यापूर्वी १९७१ मध्ये दिपू घोष-रमन घोष या भारतीय जोडीने शेवटचे आशियाई चॅम्पियनशिप (Badminton Asia Championship) दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. या खेळीनंतर भारतीय जोडीने दुहेरीत पदक कमाई केली होती. त्यानंतर आता तब्बल ५८ वर्षांनंतर सात्विक आणि चिरागने ही शानदार ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक आणि चिराग या जोडीचं (Badminton Asia Championship) कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, सात्विक आणि चिराग आम्हाला तुमचा अभिमान आहे. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Join Our WhatsApp Community