- ऋजुता लुकतुके
मागच्या दोन आठवड्यातील चमकदार कामगिरीच्या जोरावर सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अव्वल भारतीय जोडीने बॅडमिंटन दुहेरीच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे. मलेशिया ओपन स्पर्धा ही १००० रेटिंग गुणांची होती. तर भारतीय खुली स्पर्धा ७५० रेटिंग गुणांची होती. आणि अशा महत्त्वाच्या स्पर्धेत उपविजेते ठरल्यानंतर भारतीय जोडीने अव्वल स्थानावर पुन्हा एकदा हक्क सांगितला आहे. (Satwik-Chirag No 1)
गेल्यावर्षी आशियाई क्रीडास्पर्धेचं सुवर्ण जिंकल्यानंतर भारतीय जोडी पहिल्यांदा नंबर वन झाली होती. नुकत्याच संपलेल्या भारतीय खुल्या सुपर सीरिजमध्ये सात्त्विक, चिराग जोडीला अव्वल मानांकन होतं. आणि अंतिम फेरीत त्यांचा मुकाबला जागतिक अजिंक्यपद पटकावलेल्या कोरियन जोडीशी होता. पण, अंतिम फेरीत भारतीय जोडीचा २१-११, १५-२१ आणि २१-१८ असा पराभव झाला. (Satwik-Chirag No 1)
✨ Its OFFICIAL now folks ✨
Our boys Satwiksairaj Rankireddy & Chirag Shetty are WORLD NO. 1
They create HISTORY by becoming 1st EVER Indian Badminton pair to be ranked WR 1.
Proud of you boys @Shettychirag04 @satwiksairaj pic.twitter.com/FJnVfh6scb
— India_AllSports (@India_AllSports) October 10, 2023
(हेही वाचा – Rafael Nadal : फेब्रुवारीत कतार ओपनमध्ये नदाल पुन्हा कोर्टवर उतरणार)
सध्या सुरू असलेली इंडोनेशियन ओपन स्पर्धा न खेळण्याचा निर्णय सात्त्विक आणि चिराग यांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा त्यांना थोडा फटका बसू शकतो. इतर भारतीय खेळाडूंचा क्रमवारीतील विचार करता पुरुषांमध्ये अव्वल दहांत एकमेव भारतीय खेळाडू आहे तो एच एस प्रणॉय. त्याने नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर मजल मारली आहे. तर लक्ष्य सेन १९ व्या स्थानावर आहे. किदंबी श्रीकांत पंचवीसाव्या स्थानावर आहे. महिलांमध्ये सर्वोत्तम क्रमवारी पी व्ही सिंधूचीच आहे. तिने ३ महिने दुखापतीमुळे विश्रांती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तिचं क्रमवारीतील १३ वं स्थान गोठवण्यात आलं आहे. (Satwik-Chirag No 1)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community