- ऋजुता लुकतुके
भारताची बॅडमिंटन दुहेरीतील आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj & Chirag) मंगळवारपासून थायलंड ओपन स्पर्धेची मोहीम सुरू करत आहेत. ५०० रेटिंग गुण असलेल्या या स्पर्धेत दोघांसमोर आव्हान असणार आहे ते खेळात सातत्य आणण्याचं, जे अलीकडे काही स्पर्धांमध्ये हरवलं आहे. दोघांना या स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालं आहे. सर्वच बॅडमिंटनपटू पॅऱिस ऑलिम्पिकच्या (Pararis Olympics) तयारीत गुंतलेले असताना थायलंड ओपन स्पर्धेमुळे त्यांना आपलं कौशल्य आजमावण्याची आणि सरावाची चांगली संधी मिळणार आहे. (Satwiksairaj & Chirag)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज केला दाखल)
एच एस प्रणॉय (Prannoy H. S) भारताचा एकेरीतील नंबर वन खेळाडू आहे. या हंगामात त्याला तब्येतीच्या तक्रारींनी सतावलं आहे. आता थायलंड ओपनमध्ये त्याच्याही फॉर्मवर लक्ष असेल. एच एस प्रणॉयने (Prannoy H.S) जागतिक अजिंक्यपद स्पर्धा तसंच आशियाई क्रीडास्पर्धेत कांस्य पदक मिळवलं आहे. पण, त्यानंतर तो पुरेसा तंदुरुस्त नाही. (Satwiksairaj & Chirag)
पुरुषांच्या विभागात किरण जॉर्ज आणि सतीश कुमारही आपलं नशीब आजमावणार आहेत. तर महिलांमध्ये पी व्ही सिंधूच्या (P.V Sindhu) अनुपस्थितीत अस्मिता चलिहा, मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप यांच्यावर भारतीय संघाची मदार असणार आहे. उन्नती हुडा आणि इमाद फारुकी हे युवा खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला खेळ आजमावणार आहेत. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा कॅस्ट्रो या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या जोडीवर सगळ्यांचं लक्ष असेल. (Satwiksairaj & Chirag)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community