सावरकर स्मारकाच्या तायक्वांडो, तलवारबाजी उपक्रमातील खेळाडूंचे सुयश

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तायक्वांडो या साहसी खेळाच्या उपक्रमातील विद्यार्थी अभिजीत पाटील याने पंजाबमधील अमृतसर येथे सुरू असलेल्या तायक्वांडोच्या राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ स्पर्धांमध्ये कमाल केली आणि त्याने रजत पदक पटकावले. तसेच औरंगाबाद येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना सावरकर फेन्सिंग क्लबची वैभवी इंगळे हिने रजतपदक पटकावले आणि आदित्य राठोड याने कांस्यपदक मिळवले.

अस्थिभंगाची दुखापत झालेली असतानाही अभिजितने तायक्वांडोमध्ये  आपल्या खेळाचे साहसाने आणि धैर्याने प्रदर्शन केले होते. अलीकडेच अभिजितने महाराष्ट्र राज्यस्तरीय आणि मुंबई विद्यापीठ यामधील तायक्वांडोच्या स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवले होते. सावरकर स्मारकाच्यावतीने तायक्वांडोचे प्रशिक्षण देण्यात येते, राजेश खिलारी हे त्याचे प्रशिक्षक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी अभिजितच्या या यशाबद्दल प्रशंसा केली आहे.

(हेही वाचा हिंदूंचे हत्याकांड घडवणाऱ्या आयएसआयच्या दोन दहशतवाद्यांचा पाकिस्तानातच खात्मा!)

दरम्यान, पुणे -बालेवाडी येथे महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकच्या मंचावर अभिजित पाटील याचा दिगग्जांनी या निमित्ताने सन्मानही केला. तलवारबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना सावरकर फेन्सिंग क्लबची कु. वैभवी इंगळे हिने वैयक्तिक फॉइल प्रकारात रजतपदक व कु. आदित्य राठोड याने वैयक्तिक ईपी प्रकारात कांस्यपदक पटकावले.  या दोघांचे प्रशिक्षक राहुल वाघमारे होते, तर संघ व्यवस्थापक प्रियांका धुरी होत्या. सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी तलवारबाजीतील यशाबद्दल खेळाडू आणि प्रशिक्षकांची प्रशंसा केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here