सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंचे सुयश; सुवर्ण आणि रजत पदकाची कमाई

सावरकर तायक्वांडो अकादमीच्या दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक, बालेवाडी, पुणे येथे चालू असलेल्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. वरिष्ठ पुरुष गटामध्ये तंवीर राजे (७४ किलो वजनी गट) याने सुवर्णपदक पटकावले, तसेच अभिजित पाटील (५४ किलो वजनी गट) याने रजतपदक पटकावले.

अकादमीचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी ही माहिती दिली. या कामगिरीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे, तसेच अकादमीची प्रशंसा केली आहे.

१ ते १५ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असणारे सर्व क्रीडा प्रकारच्या धर्तीवर महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक महाराष्ट्र राज्याच्या विविध शहरात सुरू आहे. तर ५ ते ८ जानेवारी या कालावधीत तायक्वाँडो खेळ, बालेवाडी, पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल इथे झाला. याचे उद्घाटन तसेच समारोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)

सावरकर तायक्वाँदो अकादमीचे २ खेळाडू, अभिजित पाटील – ५४ किलो  आणि  तंवीर राजे – ७४ किलो खालील वजनी गटात  मुंबई संघातून खेळले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आपल्या उच्च प्रशिक्षणाचा दर्जा या स्पर्धेत प्रदर्शित करत तंवीर राजे याने सुवर्ण तर अभिजित पाटील याने रजत पदक पटकावले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here