सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंची पुन्हा शानदार कामगिरी

अहमदनगर येथे शनिवारी, १४ जानेवारी २०२३ या दिवशी झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय तायक्वांडो पुमसे स्पर्धेमध्ये सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे.

सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी भरघोस पदके पटकावली असून एकेरी गटात ३ सुवर्णपदके, एक रजत पदक, ५ कांस्य पदके तसेच दुहेरी गटात ३ सुवर्णपदके, १ रजत पदक आणि सांघिक गटात ५ सुवर्णपदकांची कमाई केली. अकादमीचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. अकादमीच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी अभिनंदन केले आहे.

(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here