- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला. खेळाडूंचं स्वागतही जल्लोषात झालं. खेळ लोकांना एकत्र आणतो. यशासारखी दुसरी नशा नसते, याचाच प्रत्यय आज दिवसभर खेळाडू आणि चाहते घेत आहे. वातावरणात क्रिकेट विजयाचं भारावलेपण आहे. वानखेडे मैदानावर खेळाडूंचा जाहीर सत्कार झाला तेव्हा खेळाडू ढोलाच्या तालावर नाचले. एकमेकांना त्यांनी मिठ्या मारल्या. आणि भावनांना वाटही करून दिली. (Virat Kohli)
रोहित शर्माने (Rohit Sharma) सत्काराला उत्तर देताना चषक संघातील प्रत्येकाला आणि देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केला. तर विराट कोहलीने (Virat Kohli) संघातील प्रत्येकाची भावना बोलून दाखवली. रोहितबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘सामना संपल्यानंतर रोहितने (Rohit Sharma) मला विजयी मिठी मारली. तो क्षणच वेगळा होता. तो रडत होता. मी ही रडत होतो. आणि आम्ही तसेच ड्रेसिंग रुमपर्यंत काही न बोलता चालत गेलो. १५ वर्षं मी रोहितला ओळखतोय. असं रडताना मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं.’ (Virat Kohli)
(हेही वाचा- खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?)
नंतर विराटने या विजयाची २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजयाशीही केली. ‘तेव्हा सचिन पाजींचा दिवस होता तो. त्यांनी २१ वर्षं भारतीय क्रिकेटची धुरा खांद्यावर वाहिली होती. मी फक्त २१ वर्षांचा होतो. मी त्यांना खांद्यावर उचललं. मैदानात फिरवलं.’ (Virat Kohli)
𝐓𝐇𝐈𝐒 𝐃𝐔𝐎 😍😍#RohitSharma and #ViratKohli proudly lift the #T20WorldCup trophy! 🏆💙
Don’t miss the celebrations 👉 https://t.co/JWCwNhiYIo#TeamIndia #WelcomeWorldChampions pic.twitter.com/Jv5SHzhGql
— Star Sports (@StarSportsIndia) July 4, 2024
पुढे विराट म्हणाला, ‘आता मी ३५ वर्षांचा आहे. मध्ये १३ वर्षं गेली आहेत. मला आशा वाटते की, मी आणि रोहितने ही १३ वर्षं भारतीय क्रिकेटची धुरा चांगल्या प्रकारे हाताळलेली असेल. २०११ मध्ये संघातील ज्येष्ठ खेळाडू विजयानंतर रडले, तेव्हा त्याचं कारण मला पुरेसं समजलं नव्हतं. ते आज समजतंय.’ असंही विराट कोहली म्हणाला. (Virat Kohli)
(हेही वाचा- Rohit Sharma : मुंबईत ओपन – एअर बसमधील मिरवणुकीपूर्वी कर्णधार रोहितची ‘ही’ कृती उपस्थितांचं मन जिंकून गेली)
विराटने जसप्रीत बुमराचं (Jasprit Bumrah) विशेष कौतुक केलं. ‘जसप्रीत बुमराला राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावं, असा ठराव मी मांडणार आहे,’ असं कार्यक्रमाच्या यजमानाने म्हटल्यावर विराट लगेच म्हणाला, ‘मी त्यावर पहिली स्वाक्षरी करेन. एका पिढीत एखादाच असा गोलंदाज असतो, तसा बुमरा आहे. आणि तो आपल्याकडे आहे हे आपलं भाग्य,’ असं विराट म्हणाला. (Virat Kohli)
विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी टी-२० प्रकारातून आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community