बहुप्रतीक्षित आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक अखेर आज म्हणजेच बुधवार १९ जुलै रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे. पीसीबीचे चेअरमन जाका अशरफ बुधवारी संध्याकाळी ७.१५ वाजता (पाकिस्तानच्या वेळेनुसार) आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर करणार असून, भारतीय वेळेनुसार रात्री ८.१५ वाजता ते जाहीर होईल.
माहितीनुसार ३१ ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ यादरम्यान आशिया चषकाचा खेळ रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये हा १३ एकदिवसीय सामना रंगणार असून, आशियाचा जग्गजेता कोण होणार याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
…म्हणून वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब
भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमधील सामना दंबुला अथवा कोलंबो या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अद्याप यावर कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या ठिकाणावरून सुरु असलेल्या वादामुळे आशिया चषकाचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला होता. बीसीसीआय सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जाका अशरफ यांच्यामध्ये डरबन येथे नुकतीच भेट झाली. या भेटीत आशिया चषक आणि विश्वचषकासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. भारताचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळवण्यात येणार आहेत. श्रीलंकेत आशिया चषकाचे ९ सामने होणार आहे तर, चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे.
ICC and ACC meeting updates
Read details here ⤵️ https://t.co/3pgTjw3PpX
— PCB Media (@TheRealPCBMedia) July 17, 2023
(हेही वाचा – Heavy Rain : चिपळूण परिसरातील वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा)
पीसीबीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात आशिया चषकासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आशियन क्रिकेट काऊन्सिल आणि पीसीबी यांच्यामध्ये आशिया कप वेळापत्रकासंदर्भात शनिवार १५ जुलै रोजी चर्चा झाली. आशिया चषक वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. आशिया चषकाची सुरुवात पाकिस्तानच्या सामन्याने होणार आहे.
कुठे पाहाता येणार सामने?
ऑगस्ट ३१ पासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. मात्र भारताचे सर्व सामने हे श्रीलंकामध्येच खेळवण्यात येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community