रत्नागिरीच्या १० जलतरणपटूंची पोर्तुगालच्या स्पर्धेसाठी निवड

99

रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग ग्रुप आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज असून पोर्तुगालमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी या ग्रुपच्या १० जलतरणपटूंची निवड झाली आहे.

( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर वाढते अपघात; आता वाहनांवर राहणार ITMS सिस्टिमची नजर)

पुण्यात बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुपमधील जलतरणपटूंनी बॅटल (रन स्विम रन), थ्रीटल (रन स्विम शूट) आणि लेझर रन (रन अँड शूट) या स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश मिळविले. या स्पर्धेतून पोर्तुगाल येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली.

स्पर्धेमध्ये देशभरातून वेगवेगळ्या वयोगटातून सुमारे ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगण आणि हरियाणा या राज्यांमधील जलतरणपटू सहभागी झाले होते. त्यात महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या १९ स्पर्धकांनी मॉडर्न पॅथलोन असोसिएशन ऑफ रत्नागिरी या संस्थेमार्फत सहभाग घेतला.

स्पर्धेत यश मिळविणारे स्पर्धक खालीलप्रमाणे आहेत–

  • करन महेश मिलके (वयोगट १९ ते २१) – रन शूट रन (गोल्ड मेडल) प्रथम, बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय, थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय.
  • सागर तलवार (वयोगट २१ ते ३९) बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय, रन शूट रन (ब्राँझ मेडल) तृतीय.
  • आर्यन प्रशांत घडशी (वयोगट १९ वर्षांखालील) थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय, बॅटल (ब्राँझ) तृतीय.
  • आयुष काळे (१३ वर्षांखालील) रिटर्न (सुवर्णपदक) प्रथम, बॅटल (सिल्वर) द्वितीय, रन शूट रन (ब्राँझ) तृतीय.
  • निधी शरद भिडे (११ वर्षांखालील) थ्रीटल (सिल्वर) द्वितीय, बॅटल (सिल्वर) द्वितीय, रन शूट रन (ब्राँझ) तृतीय.
  • कार्तिकी प्रकाश भुरवणे- बॅटल (ब्राँझ मेडल) तृतीय, थ्रीटल (ब्राँझ) तृतीय, रन शूट रन (ब्रॉन्झ) तृतीय.
  • सोहम शशिकांत साळवी – रन शूट रन (ब्राँझ) तृतीय.

येत्या २२ ते २५ आणि २४ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान पोर्तुगाल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे. याशिवाय महाराष्ट्राकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट टाइमिंग दिलेल्या तनया महेश मिलके, योगेंद्र गिरीधर तावडे, निपुण सचिन लांजेकर या तीन खेळाडूंची विशेष खेळाडू म्हणून पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.