स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या तिरंदाजांची राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागासाठी निवड

133

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तिरंदाजी प्रशिक्षणाच्या उपक्रमातील विद्यार्थी- विद्यार्थिनींची ७ मे २०२२ या दिवशी पवई येथे झालेल्या चाचणीत निवड झाल्याने, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये स्मारकातील एकूण नऊ जणांची निवड झाली आहे. यात नऊ वर्षांखालील आणि मिनी सब ज्युनियर या स्तरावरील तिरंदाजांचा समावेश आहे. मुंबई जिल्हा तिरंदाजीमधील निवड चाचणी स्पर्धेत ही निवड करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांची झाली निवड

तिरंदाजी उपक्रमाचे प्रमुख स्वप्निल परब यांनी यासंबंधात माहिती दिली. यानुसार नऊ वर्षाखालील मुलांमध्ये अद्वय सावंत, देवांश, अभय पांचाळ तर याच गटातील मुलींमध्ये शरयू, युक्ता पवार यांचा समावेश आहे. मिनी सबज्युनियर इंडियन राऊंडमध्ये मुलांमध्ये संंकल्प जाधव आणि अर्णव सावंत तर मुलींमध्ये श्रमिका घाडिगांवकर, सोनम शेलार आणि श्रिया राऊत यांचा मिनी सब ज्युनियर कंपाऊंड राऊंडसाठी वंश पांचाल यांची निवड झाली आहे.

( हेही वाचा: आता सगळे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही; गुगल, अ‍ॅपल आणि मायक्रोसाॅफ्ट कंपनीची मोठी घोषणा )

राज्यस्तरीय स्पर्धेत जाता येणार 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तिरंदाजी प्रशिक्षणाच्या उपक्रमातील ११ जणांची मुंबई जिल्हा तिरंदाजीमधील चाचणी स्पर्धेत निवड झाली. यामुळे त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत जाता येणार आहे. अशी माहिती स्वातंत्र्यावीर सावरकर  स्मारकाच्या तिरंदाजी उपक्रमाचे स्वप्निल परब यांनी  दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.