Shaheen Afridi on Top : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने गोलंदाजांच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान

पाकिस्तानच्या बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर संघातील मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदीला आयसीसीकडून एक भेट मिळाली आहे. आयसीसी क्रमवारीत तो गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचलाय.

104
Shaheen Afridi on Top : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने गोलंदाजांच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
Shaheen Afridi on Top : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने गोलंदाजांच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानच्या बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर संघातील मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदीला आयसीसीकडून एक भेट मिळाली आहे. आयसीसी क्रमवारीत तो गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचलाय. (Shaheen Afridi on Top)

पाकिस्तान संघाला या विश्वचषकात आतापर्यंत फारसं काही हाती लागलेलं नाही. ७ सामन्यांत फक्त ३ विजयांसह पाकिस्तानी संघ पाचव्या स्थानावर आहे. पण, संघाला आगेकूच करायची असेल तर आपले सामने जिंकण्याबरोबरच इतर संघांच्या अनुकूल निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे. (Shaheen Afridi on Top)

पण, अशा परिस्थितीत पाक संघासाठी एक अनुकूल गोष्ट घडलीय, ती म्हणजे, मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचलाय. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २४ धावा देत त्याने ३ बळी मिळवले. आणि या कामगिरीने त्याने ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला मागे टाकलं आहे. (Shaheen Afridi on Top)

शेवटच्या सामन्यात शाहीनने आपला एकदिवसीय क्रिकेटमधील शंभरावा बळीही मिळवला. ५१ व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली आणि तोज गोलंदाजांमध्ये सर्वात जलद शंभर बळी पूर्ण करणारा गोलंदाजही तो ठरला आहे. या विश्वचषकातही तो चांगली कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झंपासह तो सर्वात जास्त बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिला आहे. त्याने ७ सामन्यांत १६ बळी मिळवले आहेत. यात ५ बळी टिपण्याची किमया त्याने एकदा केली आहे. (Shaheen Afridi on Top)

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे लोकप्रतिनिधी पडले अडकून)

शाहीनने अव्वल स्थान पटकावल्यावर जोश हेझलवूड आता दुसऱ्या स्थानावर घसरलाय. तर महम्मद सिराज तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा कुलदीप यादव हा आणखी एक गोलंदाज पहिल्या दहात आहे. कुलदीप सध्या सातव्या स्थानावर आहे. (Shaheen Afridi on Top)

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शकीब अल हसन अव्वल आहे. तर हार्दिक पांड्या अकराव्या आणि रवींद्र जाडेजा तेराव्या स्थानावर आहेत. (Shaheen Afridi on Top)

फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही अव्वल स्थान राखून आहे. तर त्याच्या खालोखाल शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. रोहीत आणि विराट हे पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. (Shaheen Afridi on Top)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.