Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर आयसीसीचा बडगा, शिस्तभंगाची कारवाई

Shakib Al Hasan : पाकिस्तानच्या खेळाडूवर चेंडू फेकून मारणं शकीबला महागात पडलं आहे.

99
Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर आयसीसीचा बडगा, शिस्तभंगाची कारवाई
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळालेल्या बांगलादेश संघाला त्यानंतर दोन धक्के एकामागून एक बसले आहेत. एकतर षटकांची गती न राखल्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी २ गुण आयसीसीने कमी केले आहेत. त्याचा फटका बांगलादेशला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसणार आहे. पाकिस्तानचं तर आव्हान संपलंच आहे. दुसरीकडे, बांगलादेशच्या शकीब अल हसनवर (Shakib Al Hasan) शिस्तभंगाची मोठी कारवाई झाली आहे.

शकीब अल हसन (Shakib Al Hasan) त्याच्या कामगिरीसाठी तसेच त्याच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत राहतो. एकीकडे बांगलादेशात त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. दुसरीकडे, आता आयसीसीने पाक खेळाडूला चेंडू फेकून मारल्या प्रकरणी त्याच्यावर सामन्याच्या मानधनातील १० टक्के दंड आणि एक डीमेरिट गुण अशी कारवाई केली आहे.

(हेही वाचा – Badlapur issue: ‘मविआ’ने ‘सविनय कायदेभंग’ का नाही केला?: Ashok Modak)

शाकिबला ठोठावण्यात आला इतका दंड 

पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी कसोटी दरम्यान आयसीसी आचारसंहितेचा स्तर १ भंग केल्याबद्दल शकीब अल हसनला त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. शकीबने (Shakib Al Hasan) ICC आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन केले आहे, जे ‘आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, खेळाडूचे सपोर्ट स्टाफ, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या जवळ अयोग्य वर्तन करण्यास मनाई करते.

पण या सामन्यादरम्यान शाकिबने (Shakib Al Hasan) रागाच्या भरात मोहम्मद रिझवानकडे चेंडू फेकला होता. यासाठी आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे. शाकिबने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. आयसीसीने पाकिस्तान आणि बांगलादेश संघालाही दंड ठोठावला आहे. षटकांची गती न राखल्यामुळे पाकिस्तानला मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतूनही गुण वजा करण्यात आले आहेत. बांगलादेशला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

(हेही वाचा – शत्रूच्या Submarines शोधण्यासाठी भारत आणणार ‘सोनोबॉय’)

३७ वर्षीय अनुभवी खेळाडू शाकिबने (Shakib Al Hasan) बांगलादेशकडून आतापर्यंत ६७ कसोटी, २४७ एकदिवसीय आणि १२९ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात शाकिबने कसोटीत ४५०५ धावा केल्या आहेत आणि २३७ बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाकिबच्या नावावर ७५७० धावा आणि ३१७ विकेट आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २५५१ धावा आणि १४९ बळी मिळवले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.