- ऋजुता लुकतुके
बांगलादेशचा स्टार खेळाडू शकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा जागतिक क्रमवारीत नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे. पण, मंगळवारी अगदी चुकीच्या कारणासाठी तो चर्चेत होता. सेल्फी घेण्यासाठी जवळ आलेल्या एका चाहत्याशी झटापट केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे शकीबवर टीका होतेय. ढाका प्रिमिअर लीगच्या सामन्यादरम्यान हा प्रसंग घडला असा अंदाज आहे. या व्हिडिओत शकीब आधी चाहत्याची मानगुट पकडतो आणि त्यानंतर त्याच्याकडून फोन काढून घेण्याचा प्रयत्न करतानाही दिसतो. (Shakib Al Hasan)
शकीब शेख जमाल क्लबकडून खेळत आहे आणि मंगळवारी त्याचा सामना प्राईम बँक क्रिकेट क्लबशी होता. सामन्याआधी होणाऱ्या नाणेफेकी दरम्यान हा प्रसंग धडला असं बोललं जातंय. शकीब चाहत्याला मैदानात बघूनच काहीसा चिडलेला दिसत होता. त्यानंतर त्याने सेल्फीसाठी नकार दिला. आणि नकार देऊनही ऐकत नाही म्हटल्यावर अखेर त्याने या चाहत्याची मानगुट पकडलेली दिसते. (Shakib Al Hasan)
Shakib al Hasan 🇧🇩🏏 went to beat a fan who tried to take a selfie 🤳
Your thoughts on this 👇👇👇 pic.twitter.com/k0uVppVjQw
— Fourth Umpire (@UmpireFourth) May 7, 2024
(हेही वाचा – दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या मुख्याध्यापिका Parveen Shaikh यांना सोमय्या विद्यालयाने केले निलंबित)
स्थानिक सामन्यात शकीबचा राग होतो अधिक व्यक्त
३७ वर्षीय शकीबची (Shakib Al Hasan) मैदानात वाद निर्माण करण्याची ही पहिली खेप नाही. मैदानावर आणि मैदानाबाहेरही शकीबचा रोष यापूर्वी अनेकांनी ओढवून घेतला आहे. त्याच्या वागणुकीतून वादही निर्माण झाले आहेत. खासकरून स्थानिक सामन्यात शकीबचा राग अधिक व्यक्त होतो. पंचांच्या निर्णयाविरुद्ध मैदानातच नाराजी व्यक्त करणं, राग व्यक्त करणं, बाद दिलं गेल्यावर यष्टी आणि बॅट आपटणं, सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांवर रागावणं, फोटोसाठी गंभीर, चिडलेली चर्या करून उभं राहणं या गोष्टी त्याच्या बाबतीत नियमितपणे आढळतात. (Shakib Al Hasan)
शकीब सध्या टी-२० विश्वचषकाची तयारी करतोय. बांगलादेशचा संघ झिंबाब्वे बरोबर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पण, शकीब अल हसनला त्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. (Shakib Al Hasan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community