- ऋजुता लुकतुके
इटलीच्या यानिक सिनरने तगडा विजय मिळवत नोवाक जोकोविचचा पराभव केला आणि शांघाय मास्टर्स (Shanghai Masters) एटीपी स्पर्धेत विजय मिळवला. या हंगामातील हे त्यांचं सातवं विजेतेपद ठरलं आहे. आणि सामन्यात त्याचा धडाकाच असा होता की, त्याने जोकोविचला संधीच दिली नाही. ७-६ आणि ६-३ असा सरळ सेटमध्ये त्याने विजय मिळवला. त्याचबरोबर एकाच हंगामात सर्वाधिक सात विजेतेपदं पटकावण्याचा विक्रमही त्याने नावावर केला आहे. यापूर्वी अँडी मरेनं ६ एटीपी विजेतेपदं पटकावली होती.
या विजयाबरोबरच यानिकने जोकोविचबरोबर ८ पैकी ४ सामने जिंकण्याची किमयाही केली आहे. ‘नोवाक हा तगडा प्रतिस्पर्धी आहे. पहिल्या सेटमध्ये नोवाकची सर्व्हिस चांगली होती. मला ती भेदण्याची संधीच मिळाली नाही. पण, टायब्रेकरमध्ये पहिल्यांदा मला वाटलं की, मी जिंकू शकेन आणि टायब्रेकर जिंकल्यावर मला सामना सोपा झाला,’ असं सिनरने सामन्यानंतर बोलून दाखवलं.
Simply too good 🤌
The moment @janniksin defeated the 4-time champion, Djokovic, for the Shanghai title 🏆@SH_RolexMasters | #RolexShanghaiMasters pic.twitter.com/NMYr3wIHim
— ATP Tour (@atptour) October 13, 2024
(हेही वाचा – Israel वर Hezbollah चा भयंकर हल्ला; ४ सैनिक ठार, ६० हून अधिक गंभीर जखमी)
नोवाक जोकोविचला ही स्पर्धा जिंकून १०० वी एटीपी स्पर्धा जिंकण्याची संधी होती. यापूर्वी जिमी कॉनर्स आणि रॉजर फेडररनेच आपल्या कारकीर्दीत १०० एटीपी स्पर्धा जिंकल्या आहेत. सिनर २३ वर्षांचा आहे आणि जोकोविच विरुद्ध त्याने तगडा खेळ केला. त्याची सर्व्हिस तर बिनतोड होती आणि सर्व्हिसवर त्याने ८१ टक्के गुण जिंकले. या हंगामात हार्ड कोर्टवर यानिक सिनरला फक्त दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. हे दोन्ही पराभव कार्लोस अल्काराझ विरोधातील आहेत. इंडियाना वेल्स आणि बीजिंगमध्ये त्याचा पराभव झाला.
यापूर्वी ४ वेळा जोकोविचने शांघाय मार्स्टर्स जिंकली होती. पण, यावेळी यानिक सिनरने त्याला संधीच दिली नाही. आणि सिनर या स्पर्धेचा वयाने सगळ्यात तरुण विजेता ठरला आहे. (Shanghai Masters)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community