Sharath Kamal Retires : डब्ल्यूटीटी स्टार कन्टेंडर्स स्पर्धेतील पराभवानंतर शरथ कमलची निवृत्ती

Sharath Kamal Retires : शरथ भारताचा प्रथम क्रमांकाचा टेबल टेनिसपटू होता.

53
Sharath Kamal Retires : डब्ल्यूटीटी स्टार कन्टेंडर्स स्पर्धेतील पराभवानंतर शरथ कमलची निवृत्ती
  • ऋजुता लुकतुके

टेबल टेनिसमधील भारताचा दिग्गज खेळाडू शरथ कमलचा स्टार कंटेन्डर्स स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभव झाला. त्याबरोबरच २ दशकांची या खेळातील त्याची वाटचाल आता थांबणार आहे. उपउपांत्य फेरीत भारताच्याच स्नेहित सुरावाज्जुलाने त्याचा ९-११, ८-११ आणि ९-११ असा सलग गेममध्ये पराभव केला. विशेष म्हणजे ज्या स्टेडिअममध्ये त्याने आपला आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू केला होता, तिथेच शेवटचा सामना खेळायला मिळाल्यामुळे शरथ कमल खुश होता. त्याचे कुटुंबीय या सामन्यासाठी हजर होते. (Sharath Kamal Retires)

(हेही वाचा – Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक)

प्रतिस्पर्धी स्नेहितसाठी शरथ कमल या खेळातील आदर्श होता. त्याच्यासमोर चांगली कामगिरी करत त्याने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सामन्याचा निकाल एकतर्फी दिसत असला तरी ४२ वर्षीय शरथने या सामन्यातही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पहिल्या गेममध्ये ७-९ वरून त्याने बरोबरी साधली. पण, पुढील सर्व्हिस चुकल्यामुळे हा गेम त्याला गमवावा लागला. तर दुसऱ्या गेममध्ये शरथ ५-१ असा आघाडीवर होता. पण, ही आघाडी त्याला टिकवता आली नाही. तिसऱ्या गेममध्येही शरथकडे एकदा क्षीण अशी आघाडी होती. (Sharath Kamal Retires)

(हेही वाचा – Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !)

शरथ कमलचा खेळ पाहण्यासाठी चेन्नईकरांनी सामन्याला गर्दी केली होती. कदाचित हा त्याचा शेवटचा सामना असेल अशी कल्पनाही सगळ्यांना होती. शरथ कमलने आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये दोनदा कांस्य पदकांची कमाई केली आहे. टेबलटेनिस खेळात आशियाई देशांचीच चलती असताना आणि चीन, कोरियाच्या खेळाडूंचं या खेळावर वर्चस्व असताना शरथने वारंवार त्यांच्या वर्चस्वाला शह दिला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने ४ वेळा कांस्य पटकावलं. तर राष्ट्रकूल स्पर्धेवर वर्चस्व गाजवताना त्याने तब्बल ७ सुवर्णांची कमाई केली आहे. यात २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकूल स्पर्धेत त्याने पुरुष एकेरीसह पुरुषांच्या सांघिक स्पर्धेतही दुहेरी सुवर्ण जिंकलं. जागतिक स्तरावर २०१९ मध्ये त्याने क्रमवारीत ३० वं स्थान पटकावलं होतं. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शरथ कमल आणि पी व्ही सिंधू यांना भारतीय पथकाकडून ध्वजवाहकाचा मान मिळाला होता. (Sharath Kamal Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.