Shardul Thakur : मुंबईकर तेज गोलंदाज शार्दूल ठाकूर एसेक्स काऊंटीकडून खेळणार

51
Shardul Thakur : मुंबईकर तेज गोलंदाज शार्दूल ठाकूर इसेक्स काऊंटीकडून खेळणार
Shardul Thakur : मुंबईकर तेज गोलंदाज शार्दूल ठाकूर इसेक्स काऊंटीकडून खेळणार
  • ऋजुता लुकतुके

यंदाचा रणजी हंगाम आपली बॅट आणि चेंडूनेही गाजवणारा मुंबईकर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यंदा इंग्लिश काऊंटी हंगामात एसेक्स (Essex) काऊंटीकडून खेळताना दिसणार आहे. ७ कसोटी सामन्यांसाठी एसेक्सने (Essex) त्याला करारबद्ध केलं आहे. यंदाच्या आयपीएल (IPL) मेगा लिलावात शार्दूलवर बोली लागली नव्हती. त्यामुळे तो मार्च ते मे काळात मोकळा असेल. या कालावधीत तो एसेक्स (Essex) काऊंटीकडून खेळणार आहे. ३३ वर्षीय शार्दूल (Shardul Thakur) मागची काही वर्षं दुखापतीशी झुंजत होता. शिवाय त्याचा फॉर्मही चांगला नव्हता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या त्याच्या नियमित संघाने त्याला मुक्त केलं.

पण, त्यानंतर रणजी हंगामात मात्र तो चमकतोय. अलीकडेच उपउपान्त्य सामन्यात जम्मू व काश्मीर संघाविरुद्ध त्याने ११९ धावा केल्या. तर मेघालयाविरुद्ध ८४ धावा आणि हॅट-ट्रीक घेण्याची अष्टपैलू कामगिरी त्याने केली होती. या कामगिरीमुळेच मुंबईला बोनस गुणासह बाद फेरी गाठणं शक्य झालं होतं.

(हेही वाचा – दिल्लीतील Maharashtra Sadan चा कारभार आता सुधारणार ?; मिळाले निवासी आयुक्त)

शार्दूलला भारतीय संघात लॉर्ड शार्दूल असं टोपणनाव मिळालं आहे ते मोठ्या सामन्यांमध्ये हमखास चांगली कामगिरी करण्यासाठी. आणि इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सच्या मैदानावर केलेल्या कामगिरीमुळे. भारताकडून तो ११ कसोटी, ४७ एकदिवसीय सामने आणि २० टी-२० सामने खेळला आहे.

(हेही वाचा – Shivjayanti 2025 : शिवनेरी किल्ल्यावर साजरा झाला शिवजन्मोत्सवाचा सोहळा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित)

‘मी एसेक्स (Essex) काऊंटीकडून खेळायला उत्सुक आहे. मला नवीन आव्हानांचा मुकाबला करायला आवडतो. आणि मी इंग्लिश काऊंटी कधी खेळलेलो नाही. त्यामुळे मला ही चांगली संधी मिळणार आहे. माझ्यातील गुणांना इथं चांगला वाव मिळेल अशी मला आशा आहे. इंग्लिश काऊंटी खेळण्याची माझी इच्छाही त्यामुळे पूर्ण होणार आहे,’ असं शार्दूलने (Shardul Thakur) बोलून दाखवलं आहे.

अलीकडच्या कामगिरीनंतर शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत. आणि भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा कसोटी दौरा करणार आहे. त्यापूर्वी तिथे खेळण्याचा अनुभव शार्दूलला नक्की उपयोगी पडेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.