Shardul Thakur : शार्दूल ठाकूरच्या घोट्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

Shardul Thakur : डिसेंबर २०२३ मध्ये शार्दूल शेवटचा भारताकडून खेळला होता.

87
Shardul Thakur : शार्दूल ठाकूरच्या घोट्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया
  • ऋजुता लुकतुके

भारताचा तेज गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) दुखऱ्या घोट्यावर लंडनमध्ये बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. आयपीएलच्या आधीच शार्दूल पाय दुखत असल्याची तक्रार करत होता. आणि स्पर्धेत तो चेन्नईकडून खेळला खरा. पण, वेळोवेळी तो वेदनाशामक इंजेक्शन घेत होता. पण, आता आयपीएल संपल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू होण्यासाठी तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे शार्दूलने (Shardul Thakur) दुखापतीवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू हॅरी केन आणि भारताचा स्टार तेज गोलंदाज मोहम्मद शामी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडूनच शार्दूलही उपचार घेत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शार्दूलने ९ सामन्यांत ५ बळी मिळवले. २०१९ नंतर शार्दूलवर झालेली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मे २०१९ विरुद्ध जून २०२४,’ असा संदेश शार्दूलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिला आहे. (Shardul Thakur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

(हेही वाचा – MSRTC मधील विनंती बदल्या संगणकीय ॲपव्दारे होणार)

शार्दूल ठाकूर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो आपली शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी खेळला. आतापर्यंत ११ कसोटींत त्याने २८ च्या सरासरीने ६४ बळी मिळवले आहेत. तर भारताकडून तो ४७ एकदिवसीय सामने खेळला आहे. आणि यात ३० धावांच्या सरासरीने त्याने ३३ बळी मिळवले आहेत. (Shardul Thakur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.