Sheetal Devi : भारताची पॅरा – तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर

पॅरा आशियाई क्रीडास्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीत भारतासाठी दोन सुवर्ण पदकं जिंकणारी तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.

334
Sheetal Devi : भारताची पॅरा - तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर
Sheetal Devi : भारताची पॅरा - तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर
  • ऋजुता लुकतुके

पॅरा आशियाई क्रीडास्पर्धेत (Para Asian Games) कम्पाऊंड तिरंदाजीत भारतासाठी दोन सुवर्ण पदकं जिंकणारी तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. (Sheetal Devi)

चीनच्या होआंगझाओ इथं झालेल्या पॅरा आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची पॅरा तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) लक्षवेधी ठरली होती. दोन्ही हात नसलेली शीतल पायांनी धनुष्य धरून लक्ष्यभेद करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. कम्पाऊंड प्रकारात शीतलने भारतासाठी दोन सुवर्ण जिंकली होती. (Sheetal Devi)

आणि या कामगिरीच्या जोरावर आता तिने पॅरा तिरंदाजांच्या कम्पाऊंड क्रमवारीत जागतिक स्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली पॅरा तिरंदाज आहे. तर तिचा संघ सहकारी राकेश कुमारनेही आशियाई स्पर्धेत (Asian competition) तीन सुवर्ण जिंकली होती. तो आता जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Sheetal Devi)

(हेही वाचा – Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक)

शीतलची आणखी एक महिला संघ सहकारी सरितानेही पॅरी तिरंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेत नुकतंच तिने कांस्य पदक जिंकलं होतं आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सरिताने जागतिक क्रमवारीत सहावं स्थान पटकावलं आहे. (Sheetal Devi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.