Shikhar Dhawan Retires : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम

Shikhar Dhawan Retires : भारतीय क्रिकेटमध्ये गब्बर सिंग अशी शिखरची ओळख आहे.

132
Shikhar Dhawan : निवृत्तीनंतर शिखर धवन कोणत्या नवीन इनिंगच्या तयारीत?
  • ऋजुता लुकतुके

आपल्या बेडर डावखुऱ्या फलंदाजीमुळे गब्बर सिंग अशी ओळख असलेल्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शनिवारी सकाळी अचानक आपल्या ट्विटर पोस्टवर निवृत्तीची घोषणा त्याने जाहीर केली. त्याबरोबरच त्याने एक व्हीडिओ शेअर केला आहे. आपली ४२ क्रमांकाची जर्सी, आंतरराष्ट्रीय प्रवासातील महत्त्वाचे क्षण, मिळालेली बक्षीसं यांचे फोटो आणि व्हिडिओ यात आहेत. सोबतच संदेश आहे, ‘मी क्रिकेटमधील माझ्या कारकीर्दीचा शेवट करत आहे. त्याक्षणाला माझ्याबरोबर आहेत या आंतरराष्ट्रीय प्रवासातील अनंत आठवणी आणि तुमचं प्रेम व त्यासाठी माझी कृतज्ञता. तुमचं प्रेम आणि पाठिंबा यासाठी शतश: धन्यवाद. जय हिंद!’

(हेही वाचा – India vs England Test Series : भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ५ कसोटी खेळणार)

३८ वर्षीय शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतासाठी ३४ कसोटी १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळला आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील त्याची सरासरी तगडी म्हणजे ४० धावांच्या वर आहे. कसोटीत ७ शतकं आणि ५ अर्धशतकांसह त्याने २,३१५ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १७ शतकं आहेत. आणि त्याने ४४ च्या सरासरीने एकूण ६,७९३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने आपली शेवटची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा २०१३ मध्ये जिंकली. ती जिंकून देण्यात शिखरच्या बेडर फलंदाजीचा मोठा वाटा होता. त्यालाच मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.

त्याचवर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पणात त्याने १६० चेंडूंत १८७ धावा केल्या होत्या. पदार्पणातील सर्वात जलद शतकाचा विक्रम त्याच्या नावावर तेव्हा होता. तर २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकातही तो भारताचा यशस्वी आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.