Shiv Chhatrapati Awards : ऋतुराज गायकवाड, शकुंतला खटावकर यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार

यंदा छत्रपती पुरस्कारासाठी ८९ खेळाडूंची निवड झाली आहे.

90
Shiv Chhatrapati Awards : ऋतुराज गायकवाड, शकुंतला खटावकर यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार
Shiv Chhatrapati Awards : ऋतुराज गायकवाड, शकुंतला खटावकर यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार
  • ऋजुता लुकतुके

२०२३-२४ साठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची (Shiv Chhatrapati Awards) घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती तिरंदाज आदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांचा समावेश यंदाच्या यादीत करण्यात आला आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषण क्रीडामंत्री भारणे यांनी केली आहे. पुण्यात शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Shiv Chhatrapati Awards)

(हेही वाचा – BJP : शेकापाचा लालबावटा सोडून पाटील कुटुंबाची कमळाकडे वाटचाल; रायगडच्या राजकारणात भूकंप)

सन २०२२-२३ आणि २०२३-२४ अशा दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे (Sudhir More) यांनी दिली आहे. मुंबईत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati Awards) असे एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. १८ खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करणयात येणार आहे. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

पुरस्कराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati Awards) देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे. २००१ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. १९७९ ते १९८२ कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ८ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.