Vinod Kambli : विनोद कांबळीच्या उपचारांसाठी शिवसेना देणार ५ लाख रुपये

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर सध्या ठाण्यात उपचार सुरू आहेत.

88
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या उपचारांसाठी शिवसेना देणार ५ लाख रुपये
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या उपचारांसाठी शिवसेना देणार ५ लाख रुपये
  • ऋजुता लुकतुके

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या (Vinod Kambli) मदतीसाठी आता राजकीय पक्ष शिवसेना धावून आला आहे. कांबळी सध्या ठाण्याच्या आकृती रुग्णालयात उपचार घेत आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या वतीने कांबळीच्या उपचारांसाठी ५ लाख रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. शिंदे यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या फाऊंडेशनकडून ही मदत कांबळीला दिली जाईल. पुढील आठवड्यातच हे पैसे कांबळीच्या कुटुंबीयांना दिले जातील.

(हेही वाचा – Maharashtra Mandir Nyas Parishad : प्रत्येक मंदिरासाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !)

तसंच एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंसह कांबळीच्या भेटीसाठीही येणार आहेत. दरम्यान, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, कांबळीची प्रकृती स्थिर असली तरी गंभीरच आहे. तो खाटेवरून उठू किंवा चालू शकत नाहीए. काही महिन्यांपूर्वी त्याला मेंदूचा झटका आला होता. त्यातून तयार झालेल्या रक्ताच्या गाठीमुळे कांबळीला (Vinod Kambli) हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण, एरवी कांबळी त्याला भेटायला आलेल्या वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. ‘या परिस्थितीतून नक्की बाहेर येईन,’ या आशयाचं एक हिंदी गाणं अलीकडेच त्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणून दाखवलं. त्याने तब्येत सुधारण्याच्या बाबतीत सकारात्मकता दाखवली आहे.

(हेही वाचा – Boxing Day Test : विराट कोहलीवर बेशिस्त वर्तनासाठी कारवाई, २० टक्के मानधन कापणार )

तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी २ ते ३ दिवसांत त्याला रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचं म्हटलंय. विनोद कांबळीचे (Vinod Kambli) काही व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाले होते. यात त्याला चालतानाही लोकांची मदत घ्यायला लागत होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात कांबळी व्यासपीठावर होता. आणि तिथेही त्याच्या खालावलेल्या प्रकृतीची कल्पना येत होती. त्यातच २ दिवसांपूर्वी त्याला सतत चक्कर येत असल्यामुळे ठाण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांत कांबळीवर दोनदा ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर अती मद्यपानामुळेही त्याची प्रकृती खालावल्याचं बोललं जातं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.