अथक परिश्रमाने तायक्वांदोमध्ये अग्रेसर बनली शिवानी 

124

आपल्या खेळातील सराव व ध्येय यात खंत पडू नये यासाठी तिचे तायक्वांदो या खेळावरील प्रेम भारावून टाकणारे तर आहेच, तितकच ते खेळणासाठी सुविधांच्या अभावाने नाक मुरडणाऱ्यांसाठी  प्रेरकच देखील आहे. ठाण्यातील एका साध्या रिक्षा ड्रायव्हरची मुलगी ती. लहानपणीपासून भाऊ राकेश यांच्यासोबत ब्रुसलीचे चित्रपट पाहता पाहता आणि लुटपुटूच्या मारामाऱ्या करता करता आई मीना खोले यांनी शिवानीला तायक्वांदो सारख्या खेळाच्या अकादमीत दाखल केले. आणि तेच तिचे करीअर होऊन गेले. यात स्वतःलाच स्वतःचा आदर्श मानणारी शिवानी तिचे प्रशिक्षक राजेश मुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००८-२००९ मध्ये पहिल्यांदाच मुंबई महापौर तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. यानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिच्या खेळाच्या खडतर प्रवासाची सुरुवात झाली.

शिवानीचा आत्मविश्वास 

शिवानीने शालेय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत विविध शालेय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदके प्राप्त केली आणि सुवर्णकन्या सुवर्ण पदकाची मानकरी ठरत गेली. पुढे शिवानीला तिच्या करीयरसाठी सतत झटणाऱ्या तिचे प्रशिक्षक (राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते/राष्ट्रीय शालेय सुवर्ण पदक विजेते/अखिल भारतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धा सुवर्ण पदकविजेते) राजेश मुरव यांच्या मार्गदर्शनाखाली द. आंध्रा महासभा आणि जिमखाना, दादर पूर्व, मुंबई-१४ येथे चालणाऱ्या टायगर्स तायक्वांदो अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि ती तिच्या शिक्षकांसोबत १00 पेक्षा अधिक मुला-मुलींना या खेळाचे धडे देऊन आपली सामाजिक जबाबदारी निभावते आहे.  सध्या शिवानी प्राचार्य डॉ जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्य भारती पुरस्वानी, क्रिडा संचालक राहुल अकुल आणि पुष्कर पवार यांच्या आपुलकीच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहे.

raj

 

(हेही वाचा संजय राऊतांना मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक, कोठडीतील मुक्काम वाढणार?)

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निवड 

शिवानी म्हणते, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण मानगावकर, ऑलिम्पिक क्रीडा संचालक ओंकार सिंग आणि उप क्रीडा संचालक जसबीर कौर यांसारख्या विद्यार्थी हित व खेळाची आवड जपणाऱ्या शिक्षणप्रेमींनी आपल्या विकासासाठी ख-या अर्थाने दाही दिशा मोकळ्या करून दिल्या. तायक्वांदो प्रशिक्षक राजेश मुरव यांच्या मार्गदर्शनाने खालसा महाविद्यालयामध्ये तायक्वांदो प्रशिक्षण घेऊन मी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत एकूण ५ वेळा आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सहभाग तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवू शकले. २०१९-२०२० ला पटियाला येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत मी कांस्यपदकाची कमाई करु शकले. पुढे जागतिक विद्यापीठ तायक्वांदो चॅम्पियनशिप २०१९-२० पात्रता फेरीसाठी माझी निवड झाली, तसेच टोकियो २०२० ऑलिंपिक खेळांसाठी आशियाई पात्रता स्पर्धा २०२१ साठी निवड झाली. सतत खेळाडूंच्या हितासाठी झटणाऱ्या बाळा नांदगावकर यांनी वेळोवेळी आपला अमुल्य वेळ आम्हाला देऊन सतत आम्हाला मार्गदर्शन केले.

New Project

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.