भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान या कसोटी मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला असून अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे परंतु त्याआधीच फिंचने निवृत्ती जाहीर केली आहे.
( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना )
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार म्हणून अॅरॉन फिंचची जगभरात ओळख आहे. २०२१ साली टी २० विश्वचषक आणि २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणे या माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठवणी असतील असे त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
अॅरॉन फिंचने १४६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७ शतकांसह ३८.९० च्या सरासरीने एकूण ५४०६ धावा केल्या आहेत. फिंचने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामनेही खेळले आहेत. फिंचने कसोटीच्या १० डावांमध्ये केवळ २७८ धावा केल्या असून यामध्ये २ अर्धशतकांची नोंद आहे. त्याने अचानक निवृत्ती जाहीर केल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना सुद्धा धक्का बसला आहे.
Join Our WhatsApp Community