नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान – मुख्यमंत्री Eknath Shinde

135
नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान - मुख्यमंत्री Eknath Shinde
नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान - मुख्यमंत्री Eknath Shinde

पॅरिस ऑलिंपिक २०२४ (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकर (Shooter Manu Bhakar) हिने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे. (Eknath Shinde)

(हेही वाचा – CM Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : मुंबईतील दहा प्रशिक्षणार्थींची निवड)

महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल (10 meter air pistol) नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Eknath Shinde)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.